Raj-Uddhav Thackeray: 'बाहेरुन आलेल्या ठाकरेंनाही महाराष्ट्रानं...'; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंदांचं धक्कादायक विधान

Maharashtra Politics : महाराष्ट्र ही संतांची भूमी असून येथे अनेक विद्वान झाले आहेत.ज्यांनी खूप चांगल्या शिकवणी देऊन स्वतःला देवाला समर्पित केले आहे.पण तरीही राज ठाकरे-उद्धव ठाकरेंनी मला मराठी शिकवावी, मी दोन महिने मुंबईत असणार आहे.
Avimukteshwaranand swami on Raj And Uddhav Thackeray.jpg
Avimukteshwaranand swami on Raj And Uddhav Thackeray.jpgSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : महायुती सरकारनं राज्यात हिंदी सक्तीचा निर्णय घेतल्यानंतर महाराष्ट्रात मोठा राजकीय वादंग निर्माण झाला होता. याचाच परिणाम म्हणून गेले 20 वर्षे एकमेकांविरोधात उभे ठाकलेल्या राज आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आपल्यातला वाद मिटवत मराठीच्या मुद्द्यावर एकत्र येत आवाज उठवला. याचदरम्यान,आता ठाकरे बंधूंबाबत एक मोठं विधान समोर आलं आहे.

जगद्गुरु शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती हे त्यांच्या आक्रमक आणि बेधडक विधानांनी नेहमीच चर्चेत असतात. आता त्यांनी गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरत असलेल्या ठाकरे बंधूंबाबतच खळबळजनक दावा केल्यानं पुन्हा एकदा राजकारण तापण्याची शक्यता आहे.

स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती (Shankaracharya Avimukteshwaranand Sarswati ) हिंदी-मराठीच्या वादावर म्हणाले,मराठीला कानशि‍लात लगावणारी भाषा केल्यानं यश मिळणा्र आहे का? हिंदी ही राजभाषा आहे,त्याचा प्रोटोकॉल बनत असल्याचं त्यांनीन म्हटलं. तसेच ठाकरे हेही महाराष्ट्राच्या बाहेरुन आले असा दावा करत खळबळ उडवून दिली आहे.

महाराष्ट्रानं ठाकरेंना स्वीकारले आणि आज तेच मराठीसाठी भांडत आहेत.राज ठाकरेंबाबत बोलू तर,याचा अर्थ देशातील कायदा व्यवस्था समाप्त झाली आहे. कुणी सार्वजनिक ठिकाणी उभे राहून मारहाण करण्यासाठी लोकांना प्रोत्साहित करत असेल तर कॉन्स्परन्सी आहे की,लॉ अँड ऑर्डर धोक्यात असल्याचं शं‍कराचार्यांनी म्हटलं.

Avimukteshwaranand swami on Raj And Uddhav Thackeray.jpg
Manikrao Kokate : अखेर कृषीमंत्री माणिकराव कोकाटे विधानभवनात प्रकटले; आल्याच्या दिवशीच सत्ताधारी, विरोधक तुटून पडले !

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या हिंदी-मराठीच्या भूमिकेवर शंकराचार्य यांनी यावेळी परखडपणे मत व्यक्त केलं. ते म्हणाले,‘त्यांनी हा मुद्दा आधीही उपस्थित केला होता पण तो भरती-ओहोटीसारखा आला आणि गेला. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचा हा मेळ अमेळ आहे. तो जास्त काळ टिकणार नाही. तसेच त्याचा महाराष्ट्राच्या राजकारणावर कोणताही परिणाम होणार नाही, असा दावाही शं‍कराचार्य अविमुक्तेश्वरानंद स्वामींनी केला आहे.

आपण हिंदी भाषा कशी थांबवू शकतो? आज मुंबईत बॉलीवूड आहे आणि महाराष्ट्रातील लोक बॉलीवूडच्या कमाईवर जगतात. जर त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी बॉलिवूडला चित्रपट बनवण्यापासून थांबवावे आणि मराठी चित्रपट बनवायला सुरुवात करावी. ते हिंदूंवर नाही तर भारतीयांवर हल्ला करत आहेत, जर त्यांना ते करायचे असेल तर त्यांनी दुसऱ्या राज्यात जाऊन ते करावे असा खोचक टोलाही शं‍कराचार्यांनी यावेळी लगावला.

Avimukteshwaranand swami on Raj And Uddhav Thackeray.jpg
Shashi Tharoor : शशी थरूर यांच्याकडून काँग्रेसच्या जिव्हारी लागणारा सर्वात मोठा घाव; म्हणाले, आताचा भारत हा 1975...

महाराष्ट्र ही संतांची भूमी असून येथे अनेक विद्वान झाले आहेत.ज्यांनी खूप चांगल्या शिकवणी देऊन स्वतःला देवाला समर्पित केले आहे.पण तरीही राज ठाकरे-उद्धव ठाकरेंनी मला मराठी शिकवावी, मी दोन महिने मुंबईत असणार आहे.आपण मराठी भाषा शिकू इच्छित आहे.तुम्ही जर मला मराठी शिकवली,तर देशभरात मी मराठी शिकवेन.दोन महिन्यानंतर मी जेव्हा येथून जाईन,तेव्हा त्यांच्यासोबत मराठीत बोलूनच जाईल, असेही शंकराचार्य सरस्वती यांनी म्हटले.

एकनाथ शिंदे सरकारने गायींना राज्यमातेचा दर्जा देत सन्मान केला होता. पण सध्याच्या फडणवीस सरकारनं याबाबत कुठलाही प्रोटोकॉल तयार केला नसल्याचं सांगत स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com