BJP Shiv Sena UBT alliance  Sarkarnama
विदर्भ

BJP Shiv Sena UBT alliance : महापौरपद देतो, साथ द्या! ‘डील पॉलिटिक्स’ सुरू! ठाकरसेनेला भाजपची सत्तेची लालूच?

Chandrapur : BJP Offers Mayor Post to Shiv Sena UBT, Congress Uneasy : चंद्रपूर महापालिकेत काँग्रेसला शह देण्यासाठी भाजपने शिवसेना ठाकरे सेनेसोबत युतीचा प्रस्ताव ठेवत महापौरपदाबाबत मोठा निर्णय घेतला आहे.

Pradeep Pendhare

Chandrapur mayor post offer : काँग्रेसला चंद्रपूरमधील महापालिकेत रोखण्यासाठी भाजपने तिरकी चाल खेळली आहे. महाविकास आघाडीतील काँग्रेसच्या मित्रपक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाला, सत्तेत येण्याची लालूच दिली आहे.

शिवसेना ठाकरे सेनाला सत्तेत येण्याचा प्रस्ताव देण्याबरोबर सव्वा-सव्वा वर्षांसाठी महापौरपद वाटून घेऊ, असा प्रस्ताव दिला आहे.

चंद्रपूर महापालिकेतील महापौर-उपमहापौर निवडीचा सत्तासंघर्ष निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे. भाजपने (BJP) काँग्रेसला कोणत्याही परिस्थितीत महापौरपदापासून दूर ठेवण्याचा चंग बांधला आहे. यातून शिवसेना ठाकरे सेनेला बरोबर घेण्याचं ठरवलं आहे. तसा प्रस्तावच दिल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

भाजपकडून शिवसेना ठाकरे सेनेला (Uddhav Thackeray) महापौर पद सव्वा–सव्वा वर्षांसाठी वाटून घेण्याचा प्रस्ताव दिला आहे. यासोबतच, पाच वर्षांच्या कालावधीत दोन वर्षे स्थायी समिती अध्यक्षपद आणि उपमहापौर पदाचीही ऑफर भाजपने शिवसेना ठाकरे सेनेला दिल्याचे समोर येत आहे. या प्रस्तावाची चर्चा सुरू असताना, काँग्रेसच्या गोठ्यात राजकीय हाचलाचींना वेग आला आहे. भाजपचा डाव उधळून लावण्यासाठी काँग्रेसकडून तयारी केली जात आहे.

परंतु, या प्रस्तावात मोठी अडचण समोर आली आहे. भाजपने महापौरपद पहिले मागितले आहे. शिवसेना ठाकरे सेनेने हा प्रस्ताव मान्य करणार नसेल, तर भाजप सत्तेत सहभागी न होता विरोधी बाकांवर बसेल, अशी भूमिका घेतली आहे. काँग्रेस यात सर्व बाजूने अडचणीत सापडले असून, सत्तास्थापनेत पिछाडीवर पडले आहे.

काँग्रेसमधील अंतर्गत वाद उफाळला

काँग्रेसमधील नेते विजय वडेट्टीवार आणि खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यातील राजकीय वाद उफाळला आहे. दिल्लीतून हस्तक्षेपानंतर देखील दोन्ही बाजूने एकमेकांवर विश्वास नसल्याचे दिसते आहे. त्याचाच फायदा भाजप घेत, सत्तेची चंद्रपूर महापालिकेत जुळवाजुळव करत आहे. यातूनच मविआमधील शिवसेना ठाकरे सेनेला सत्तेत येण्याचा प्रस्ताव दिला आहे. भाजपच्या या प्रस्तावावर शिवसेना ठाकरे सेना कोणता निर्णय घेते, याकडे लक्ष लागलं आहे.

शिवसेना ठाकरे सेना किंगमेकरच्या भूमिकेत

शिवसेना ठाकरे सेना चंद्रपूर महापालिकेत ‘किंगमेकर’च्या भूमिकेत आहे. भाजपसोबत हातमिळवणी केल्यास चंद्रपूरमध्ये राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलतील. काँग्रेससोबत गेल्यास सत्तेचे गणित वेगळे वळण घेईल. काँग्रेस 27, काँग्रेस समर्थित जनविकास सेना 3, भाजप 23, शिवसेना ठाकरे सेना पक्ष सहा, वंचित आणि अपक्ष प्रत्येकी दोन, बसपा, AIMIM, एकनाथ शिंदे शिवसेनेला प्रत्येकी एक, असे बलाबल आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT