Chandrapur Municipal Corporation Sarkarnama
विदर्भ

Chandrapur Mayor Election: चंद्रपूर महापालिकेतील भाजप–शिवसेना युतीला ठाकरेंची 'मूक संमती'? म्हणाले, 'सत्तेत जाणं चुकीचं नाही,पण...'

Chandrapur Mahapalika Election : चंद्रपूर महानगरपालिकेतील महापौर निवडणुकीनंतर भाजप आणि शिवसेनेच्या (उबाठा) युतीने राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या नगरसेवकांना मंगळवारी (ता.24) ‘मातोश्री’वर बोलावण्यात आले.

Rajesh Charpe

Chandrapur News: चंद्रपूर महानगरपालिकेतील महापौर निवडणुकीनंतर भाजप आणि शिवसेनेच्या (उबाठा) युतीने राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या नगरसेवकांना मंगळवारी (ता.24) ‘मातोश्री’वर बोलावण्यात आले. या बैठकीत सत्तेत जाणे चुकीचे नाही. मात्र, पक्षाचे स्वतंत्र अस्तित्व टिकवून ठेवणे महत्त्वाचे आहे, असा सल्ला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नगरसेवकांना दिला. त्यामुळे भाजप–उबाठा युतीला ठाकरे यांनी अप्रत्यक्ष मूक संमती दिली, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

या बैठकीत महापौरपदासाठी भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांकडून पक्षप्रवेशाच्या ऑफर आल्याची माहिती उबाठाचे जिल्हा प्रमुख संदीप गिऱ्हे यांनी ठाकरे यांना दिली. मात्र, जिल्ह्यात पक्षाचे अस्तित्व कायम ठेवण्यासाठी त्या ऑफर नाकारल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

काँग्रेसने महापौर पद देण्यास अनुकूलता न दाखवल्याने तर भाजपने सव्वा–सव्वा वर्ष महापौर पद वाटून घेण्याचा प्रस्ताव मान्य केल्याने भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याचे गिऱ्हे यांनी सांगितले. यासंदर्भात स्टॅम्प पेपरवर करार केल्याची माहितीही देण्यात आली.

सर्व बाबी ऐकल्यानंतर सत्तेत जाणे चुकीचे नाही. मात्र, पक्षाचे स्वतंत्र अस्तित्व टिकवून ठेवणे महत्त्वाचे असल्याचा सल्ला देण्यात आला. लोकांच्या कामांसाठी सत्ता आवश्यक असली तरी भाजपपासून सावध आणि चाणाक्ष राहा, आवश्यक तेथे विरोधाची भूमिका घ्या, संघटना मजबूत ठेवा आणि पक्ष वाढवा, असा स्पष्ट संदेश ठाकरे यांनी उपस्थित नगरसेवकांना दिला.

दरम्यान, मनसेकडून नगरसेवकांना आर्थिक प्रलोभन दिल्याचे आरोप करण्यात आले होते. मात्र, या आरोपांना फारसे महत्त्व न देता स्थानिक संघटनात्मक बळकटीवर भर देण्याचा सल्ला ठाकरे यांनी दिल्याचे समजते.

या बैठकीनंतर भाजप–उबाठा युतीला ठाकरे यांनी ‘मूक संमती’ दिल्याची चर्चा होत आहे. या बैठकीला दोन अपक्ष नगरसेवक नंदू नागरकर आणि उपमहापौर प्रशांत दानव उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT