NCP News : चंद्रपूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील 15 पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश पार पडला. यासाठी गडचिरोलीचे आमदार, माजी वनमंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी यासाठी पुढाकार घेतला. पण आत्राम यांच्या या पुढाकारामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते नाराज झाले आहेत.
राष्ट्रवादीचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर व शहर अध्यक्ष राजीव कक्कड यांनी या प्रवेश समारंभाला दांडी मारली होती. राष्ट्रवादीचे शहर आणि जिल्हाध्यक्षांना विश्वासात घेण्याते आले नाही अशी नाराजी अनेकांनी बोलून दाखवली. यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आपसातच संघर्ष निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
नितीन भटारकर यांनी मात्र नाराजीच्या चर्चा फेटाळून लावल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेशावरून कुठलीच नाराजी नाही. पक्ष मोठा होणार असल्याने त्यांचे स्वागतच आहे. माझे क्षेत्र ग्रामीण आहे. चंद्रपूर शहरातील प्रवेश असल्याने मी उपस्थित नव्हतो. मला प्रवेशाची माहिती देण्यात आली होती असा दावा भटारकर यांनी केला.
शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे चंद्रपूर शहर अध्यक्ष तसेच माजी नगराध्यक्ष दीपक जयस्वाल, माजी नगरसेवक राजेंद्र आखरे, विनोल लभाने, महानंदा वाळके, रवींद्र वाळके, निमेश मानकर, राहुल देवतळे, मनोज बंडेवार, हर्षल भुरे, सुहास पिंगे, नजमा शेख यांच्यासह एकूण 15 पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणूक तोंडावर असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात कोणतीही तयारी सुरू नाही. कोणी पुढाकार घेत नाही. पक्षाला पाठबळ देत नाही. त्यामुळे दीपक जयस्वाल यांच्या नेतृत्वात नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याचे सांगण्यात येते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.