Solapur NCP : राष्ट्रवादी सरचिटणीसाच्या आत्महत्येप्रकरणी पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यासह सात जणांवर गुन्हा दाखल

NCP Crime News : राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सरचिटणीस ओंकार हजारे यांचा मृतदेह 08 जून रोजी सुपर मार्केटजवळील एका मोटारीत आढळून आला होता. त्यांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली होती.
omkar Hazare
omkar Hazaresarkarnama
Published on
Updated on

Solapur, 01 July : राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सरचिटणीस ओंकार हजारे यांच्या आत्महत्येप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी उपमहापौर नाना काळे यांच्यासह सात जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी ओंकार हजारे यांच्या भावाने फौजदार चावडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.

ओंकार यांचा भाऊ विशाल महादेव हजारे यांच्या फिर्यादीवरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे (NCP SP) माजी उपमहापौर नाना काळे, ओंकारची पत्नी स्वाती हजारे, ज्ञानेश्वर हजारे, राजश्री हजारे, मंगेश पवार, निखिल बनसोडे आणि ओम घाडगे (सर्वजण रा. सोलापूर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे (NCP Youth Congress) सरचिटणीस ओंकार हजारे यांचा मृतदेह 08 जून रोजी सुपर मार्केटजवळील एका मोटारीत आढळून आला होता. त्यांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली होती. त्यामुळे सोलापूरच्या राजकारणात एकच खळबळ उडाली होती.

महादेव हजारे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ओंकार हजारे आणि स्वाती यांचे प्रेमसंबंध होते. दोघांनी 2019 मध्ये प्रेमविवाह करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, स्वाती हिच्या कुटुंबीयांचा ओंकार हजारे याच्यासोबत लग्नास विरोध होता. मात्र, घरच्यांच्या विरोध झुगारून या दोघांनी लग्न केले होते. त्यामुळे स्वातीच्या घरच्यांनी लग्नानंतर ओंकार यांना मानसिक त्रास द्यायला सुरूवात केली होती.

omkar Hazare
Solapur Politic's : पवारांचा आमदार अन्‌ अजितदादांच्या निकटवर्तीयामध्ये विधीमंडळाच्या गॅलरीत गुफ्तगू; दोघांत काय चर्चा रंगली?

दरम्यान, स्वाती आणि ओंकार हजारे यांच्यात २०२३ मध्ये जोरदार भांडण झाले होते. त्या भांडणानंतर स्वाती आणि ओंकार हे वेगवेगळे (विभक्त) राहत होते. त्यानंतर काही दिवसांनी स्वाती हिने ओंकार हजारे यांच्याकडे घटस्फोट देण्याची मागणी केली होती. मात्र, ओंकार यांचा घटस्फोट देण्यास विरोध दर्शविला होता. त्यामुळे स्वातीसह तिच्या कुटुंबीयांनीही ओंकार यांना त्रास द्यायला सुरुवात केली होती.

omkar Hazare
Sudhir Mungantiwar : सुधीरभाऊंनी तुपेंना कोंडीत पकडले; ‘ही संधी पुन्हा नाही...सचिवांना बांधून आणण्याची परवानगी द्या अन्‌ तुमचं नाव सुवर्णाक्षरांनी लिहून घ्या’

सासरच्या लोकांकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळूनच 08 जून रोजी ओंकार हजारे यांनी आत्महत्या केली होती. विशेष म्हणजे त्याच दिवशी मेव्हण्याचा विवाह होता. तरीही ओंकार हजारे यांना लग्नासाठी बोलविण्यात आले नव्हते. त्यामुळे ओंकार हजारे हे निराशेत होते, त्यातूनच त्यांनी आत्महत्या केली, असावी, असे सांगितले जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com