Chandrashekhar Bawankule News : 'शरद पवार यांच्या मनात काय आहे?, महाराष्ट्रात दंगल घडणार असे ते का बोलत आहे आपणास ठावूक आहे. मात्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर दंगली घडू नये, अशी आमची इच्छा आहे.' असे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत.
तसेच 'वादग्रस्त विधान करण्यापेक्षा समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना रोखण्यासाठी पुढाकार घ्यावा., असे म्हणत बावनकुळे यांनी पवारांवर निशाणा साधला.
बाबासाहेब आंबेडकर यांच्या आरक्षणाच्या भूमिकेला कॉंग्रेसने कधीच मदत केली नाही. सामाजिक आरक्षण योग्य पद्धतीने हाताळले नाही. त्यांनी समाजा-सामजात वाद निर्माण केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना लोकसभेत हरविण्याचे काम केले, असेही यावेळी बावनकुळे(Chandrashekhar Bawankule) म्हणाले.
महाविकास आघाडी(Mahavikas Aghadi) आणि भाजपचे नेते यांच्यात आरक्षणावरून सुरू असलेला वाद लक्षात घेता आगामी विधानसभेची निवडणूक आरक्षणाच्याच मुद्यावर लढल्या जाणार असल्याचे स्पष्ट होते. लोकसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने भाजपची सत्ता आल्यास घटना बदलणार असा प्रचार केला होता. त्याचे स्पष्टीकरण देता देता भाजप नेत्यांच्या नाकीनऊ आले होते. याचा फायदाही आघाडीच्या उमेदवारांना झाला.
मुस्लिम, दलितांची मते एकवटली आणि महायुतीच्या पारड्यात पडली होती. आता आरक्षण हा मुद्दा संवेदनशील झाला आहे. मराठा आणि ओबीसींमध्ये वाद निर्माण झाला आहे. हा वाद भाजपनेच जाणीवपूर्वक निर्माण केला असल्याचा आरोप केला जात आहे. तर जरांगे पाटील यांच्या पाठिशी शरद पवार(Sharad Pawar) आहेत असा आरोप भाजपच्यावतीने केला जात आहे.
दुसरीकडे आरक्षणावर बोलावण्यात आलेल्या सर्वपक्षीय बैठकीला अनुपस्थित राहिल्याने महाविकास आघाडीच्या नेत्यांना कोंडित पकडले जात आहे. मराठा समाजाला ओबीसीच्या कोट्यातून आरक्षण द्यायचे का? अशी विचारणा करून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी असे आवाहन भाजपच्यावतीने केले जात आहे.
यावर बावनकुळे म्हणाले, 'फडणवीसांना(Devendra Fadnavis) खलनायक ठरविण्याचे काम केले जात आहे. मात्र त्यांची मराठा आरक्षणावर भूमिका प्रामाणिक आहे. त्यांची उंची कमी करण्याचा प्रयत्न काही लोक करत असल्याचेही बावनकुळेंनी यावेळी सांगितले.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.