Shivsena Politics News : 'आमदार आमचा, त्यामुळे मतदारसंघही आमचा' शिवसेनेचा दावा

Shindesena has claimed four assembly constituencies : शिंदे सेनेने निवडणूक प्रभारी व निवडणूक निरीक्षक नेमून पूर्व विदर्भातील रामटेक, उमरेड, चंद्रपूर आणि भंडारा या चार विधानसभा मतदारसंघावर दावा केला आहे.
Eknath shinde krupal tumane
Eknath shinde krupal tumaneSarkarnama
Published on
Updated on

Nagpur News : शिंदे सेनेने निवडणूक प्रभारी व निवडणूक निरीक्षक नेमून पूर्व विदर्भातील रामटेक, उमरेड, चंद्रपूर आणि भंडारा या चार विधानसभा मतदारसंघावर दावा केला आहे. या मतदारसंघाचे आमदार आमच्या खेम्यात असल्याने मतदारसंघही आमचा असा दावा करण्यात आला आहे. यावरून विशेषतः उमरेडच्या जागेवरून भाजप आणि शिवसेनेत खडाजंगी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

दोन दिवसांपूर्वी शिवसेनेच्यावतीने निवडणूक प्रभारी आणि निरीक्षकांच्या नियुक्त्या केल्या आहेत. पूर्व विदर्भातील रामटेक, उमरेड, चंद्रपूर आणि भंडाराचे निवडणूक प्रभारी म्हणून आमदार कृपाल तुमाने यांची नियुक्ती केली आहे. विशेष म्हणजे यापैकी तीन मतदारसंघात अपक्ष आमदार आहेत.

रामटेकचे आमदार व खनिकर्म महामंडळाचे अध्यक्ष आशिष जयस्वाल सुरुवातीपासूनच मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत आहे. मात्र त्यांनी अद्याप पक्षात अधिकृत प्रवेश केलेला नाही. भंडाऱ्याचे आमदार नरेंद्र भोंडेकर (Narendra Bhondekar) यांनी अलीकडेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत भंडारा जिल्ह्यात शिवसेनेत प्रवेश केला. ते अपक्ष निवडून आले होते. मूळचे ते शिवसैनिक आहेत. या दोन्ही जागा मागील निवडणुकीत भाजपने लढवल्या होत्या.

Eknath shinde krupal tumane
Navneet Rana : नवनीत राणांचा नवा नारा, 'मी मैदानात परत येईल...'

मागील निवडणुकीत चंद्रपूर विधानसभा मतदारसंघात (Vidhansabha Constituency) भाजप आमदार नाना श्यामकुळे यांचा पराभव झाला होता. अपक्ष उमेदवार किशोर जोरगेवार यांनी त्यांचा पराभव केला होता. त्यांनी अधिकृत शिंदे सेनेत प्रवेश केला नसला तरी मुख्यमंत्र्यांच्या जवळ आहे.

उमरेड विधानसभा मतदारसंघात भाजपच्या आमदार सुधीर पारवे यांचा काँग्रेसचे उमेदवार राजू पारवे यांनी पराभव केला होता. तत्पूर्वी सुधीर पारवे येथून दोन वेळा निवडून आले होते. राज्यात महायुतीची सत्ता आल्यापासून राजू पारवे भाजपात जाणार असल्याची चर्चा होती.

Eknath shinde krupal tumane
Ajit Pawar : "...तर राजकारण सोडेल"; अजितदादांच्या निकटवर्तीय नेत्याचं मोठं विधान

भाजपचे (BJP) रामटेक लोकसभेचे उमेदवार होते. त्यांचे नाव निश्चितसुद्धा करण्यात आले होते. मात्र हा मतदारसंघ शिवसेनचा होता. मुख्यमंत्र्यांनी तो सोडण्यास नकार दिला होता. येथे कृपाल तुमाने खासदार होते. ते दोन वेळा निवडून आले होते. शेवटी भाजपने तडजोड केली. राजू पारवे यांचा शिवसेनेत प्रवेश करून त्यांना लोकसभेचे उमेदवार केले होते. काँग्रेसने त्यांचा राजीनामा तत्काळ मंजूरसुद्धा केला होता. मात्र लोकसभेत पारवे पराभूत झाले. ते मनाने भाजपात आहे परंतु त्यांचा पक्ष शिवसेना आहे. त्यामुळे उमरेड विधानसभा मतदारसंघात शिवसेनेने दावा केला आहे. येथून भाजपचे सुधीर पारवे हेसुद्धा निवडणूक लढण्याची तयारी करीत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com