Chandrashekhar Bawankule delivers a sharp remark urging MVA leaders to show due respect to senior leader Sharad Pawar, sparking political debate.  sarkarnama
विदर्भ

Chandrashekhar Bawankule : ''महाविकास आघाडीच्या नेत्यांनी किमान शरद पवारांचा तरी मान राखावा'' ; बावनकुळेंचा टोला!

Chandrashekhar Bawankule to Prakash Ambedkar : ...काही गोष्टी गुप्त ठेवाव्या लागतात हे प्रकाश आंबेडकर यांना माहीत असावे, असंही बावनकुळे म्हणाले आहेत.

Rajesh Charpe

Chandrashekhar Bawankule criticizes MVA leaders : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दहशतवादी आणि पाकिस्तानविरोधात राबवण्यात आलेल्या 'ऑपरेशन सिंदूर'च्यावेळी सर्वच पक्षांनी केंद्र सरकार आणि भारतीय सैन्यदलास पाठिंबा जाहीर केला होता. मात्र आता युद्ध बंदीची घोषणा झाल्यानंतर परत एकदा राजकारणाला सुरूवात झाल्याचे दिसत आहे.

''काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि संजय राऊत, उद्धव ठाकरे यांची टीम सैन्याच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. केंद्र सरकावर या संदर्भातील काही गोष्टी उघड करण्यासाठी दबाव टाकत आहेत. तर महाविकास आघाडीच्या नेत्यांना ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी या संदर्भात काही सूचना केल्या आहेत. किमान त्यांचा तरी मान महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राखावा.'' असे सांगून भाजपचे प्रदेशाध्यक्ष व राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना टोला लगावला आहे.

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, 'सैनिक देशाचे संरक्षण करतात. याविषयाचे राजकारण करू नये अशा सूचना शरद पवार यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना दिल्या आहे. ते किमान त्यांचे तरी ऐकतील.'

तसेच बावनकुळे असंही म्हणाले की, ''भाजपच्यावतीने भारत-पाकिस्तान युद्धाचा विजयाचा जल्लोष केला जात नाही. सैनिकांना प्रोत्साहन देणे, त्यांचे अभिनंदन करण्यासाठी भाजपच्यावतीने तिरंगा यात्रा काढली जात आहे. दहशतवादाला संपवण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदी सैन्याच्या माध्यमातून करीत आहेत. त्यांच्या पाठीशी सर्वांनी उभे राहावे यासाठी ही यात्रा असल्याचाही टोला बावनकुळे यांनी आदित्य ठाकरे यांचा नामोल्लेख न करता लगावला.

याशिवाय 'वंचित बहूजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर हे सरकारमध्ये नाही किंवा सरकारच्या मंत्रिपदावरही नाहीत. देशाची संबंधित व संवेदनशील माहिती उघड केली जात नाही. काही गोष्टी गुप्त ठेवाव्या लागतात हे प्रकाश आंबेडकर यांना माहीत असावे. प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर विश्वास ठेवावा. भारतीय सैन्याने पाकिस्तानातील शेकडो दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. त्याचे व्हिडिओ जाहीर झाले आहेत. संरक्षण संबंधित काही माहिती गोपनीय ठेवावी लागते, त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांची मागणी अयोग्य असल्याचेही यावेळी बावनकुळे यांनी सांगितले.

सरन्यायाधीशांच्या प्रोटोकॉलची गंभीर दखल -

सरन्यायाधीश भूषण गवई हे मुंबईत आले असताना ज्या पद्धतीने त्यांचा प्रोटोकॉल पाळला गेला नाही, त्याची दखल मुख्यमंत्र्यांनी घेतली आहे. मी स्वतः त्यांना फोन करून सरकारच्यावतीने माफी मागितली आहे. पुढच्या काळात या ठिकाणी असे होणार नाही याची नोंद महाराष्ट्र सरकारने घेतली असल्याचे बावनकुळे यांनी यावेळी स्पष्ट केली.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT