Shivsena Politics : उद्धव सेनेला धक्का, आणखी दोन माजी जिल्हा प्रमुख शिंदे सेनेत दाखल

Nagpur Shivsena UBT : आगामी स्थानिकच्या तोंडावर नागपूर जिल्ह्यात ठाकरे सेनेची साथ दोन माजी जिल्हा प्रमुखांनी सोडली आहे.
Nagpur Shivsena Politics
Nagpur Shivsena Politicssarkarnama
Published on
Updated on

Nagpur News : महायुतीचे सरकार आल्यापासून उद्धव ठाकरे सेनेतून एक एक शिवसैनिक पळ काढू लागला आहे. नागपूर जिल्ह्यातील माजी दोन जिल्हा प्रमुखांसह मनसेचेही अनेक पदाधिकारी शिंदे सेनेत दाखल झाले आहेत. यात आता आणखी दोन जिल्हा प्रमुखाची भर पडली आहे. नागपूर जिल्ह्याचे माजी जिल्हा प्रमुख बंडू तागडे आणि भंडरा जिल्ह्याचे माजी जिल्हा प्रमुख रवी वाढई यांनी शिंदे सेनेत प्रवेश केला आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत दोन्ही माजी जिल्हा प्रमुखांनी शिंदे सेनेते प्रवेश केला. तागडे हे माजी खासदार प्रकाश जाधव यांचे तर वाढई हे भंडाराचे आमदार नरेश भोंडेकर यांचे कट्टर समर्थक आहेत. जाधव सध्या उद्वव सेनेतच आहेत. माजी खासदार विनायक राऊत विदर्भाचे संपर्क प्रमुख असताना त्यांच्यासोबत बंडू तागडे यांची चांगलीच जवळीक होती. भोंडेकर अनुसूचित जातीसाठी आरक्षित असलेल्या जागेवरून निवडूण आले आहेत. दलितांना शिंदे सेनेसोबत जोडण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे.

राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्या नेतृत्वात काही महिन्यांपूर्वी उद्धव सेनेचे माजी जिल्हा प्रमुख राजू हरणे यांनी शिंदे सेनेत प्रवेश केला. यावेळी मनसेचे माजी जिल्हा प्रमुख व प्रदेश उपाध्यक्ष किशोर सरायकर यांनी विदर्भाचे संघटनमंत्री किरण पांडव यांच्या नेतृत्वात प्रवेश केला होता. सरायकर यांना पूर्व विदर्भाचे उपसंघटक म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. राजू हरणे अद्यापही प्रतीक्षेत आहेत. आता तागडे यांनी त्यांच्यासमोर स्पर्धा निर्माण केली आहे.

Nagpur Shivsena Politics
Shivsena Politics : एकनाथ शिंदेंच्या विश्वासू नेत्याकडून मिलिंद नार्वेकरांना शुभेच्छा, काही तरी शिजतंय?

जिल्हा परिषद व महापालिकेच्या निवडणुकीच्या आधी उद्धव सेनेतील पदाधिकाऱ्यांना आपल्यासोबत घेण्यासाठी स्थानिक स्तरावर एक समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बरेचशे प्रवेश परस्पर मुंबईत होत असल्याने स्थानिकांमध्ये मोठी नाराजी आहे. स्थानिक नेत्यांना याची माहितीसुद्धा नसते.

Nagpur Shivsena Politics
Shivsena UBT Politics : भाजपच्या बालेकिल्ल्यात टक्कर देण्यासाठी उद्धव ठाकरेंचा 'मास्टर प्लॅन', एक जिल्हा...

यापूर्वी माजी नगरसेवक बंडू तळवेकर यांच्या नेतृत्वात 10 नगरसेवकांनी शिंदेसेनेत प्रवेश होता. त्यापैकी पाच नगरसेवकांनी आम्ही प्रवेशच केला नसल्याचे सांगितले होते. या प्रवेश समारंभाला जिल्हा प्रमुख, शहर प्रमुख, संपर्क नेतेही उपस्थित नव्हते. यामुळे या प्रवेशावरून जिल्ह्यात संभ्रामवस्था निर्माण झाली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com