Chandrashekhar Bawankule Sarkarnama
विदर्भ

Chandrashekhar Bawankule : 'विरोधकांच्या प्रतिक्रियेला फारसे महत्त्व नाही', अर्थसंकल्पावरील टीकेवरून बावनकुळेंनी सुनावले

Chandrashekhar Bawankule Budget 2025 : केंद्रीय अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देताना बावनकुळे म्हणाले, मोदी सरकार सामान्य भारतीयांसोबत भक्कमपणे उभे आहे.आज जाहीर झालेल्या योजना व तरतुदी भारताच्या भविष्यकालीन अर्थव्यवस्थेला बळकटी देणाऱ्या आहेत.

Rajesh Charpe

Chandrashekhar Bawankule New: अर्थसंकल्प सादर होताच सत्ताधाऱ्यांमार्फत स्वागत आणि विरोधकांची टीका असाच प्रघात पडला आहे. बजेटवर प्रतिक्रिया व्यक्त करण्याची स्पर्धाच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये लागली असते. यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विरोध करणे विरोधकांचे कामच असल्याचे सांगून त्याला आपल्या लेखी फारकाही महत्त्व नसल्याचे सांगितले.

केंद्रीय अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देताना बावनकुळे म्हणाले, मोदी सरकार सामान्य भारतीयांसोबत भक्कमपणे उभे आहे, याचे हे प्रमाण आहे. आज जाहीर झालेल्या योजना व तरतुदी भारताच्या भविष्यकालीन अर्थव्यवस्थेला बळकटी देणाऱ्या आहेत. भारत जगावर स्वार होईल, इतकी भक्कम तटबंदी करण्यात आली आहे.

नरेंद्र मोदी यांच्या कुशल नेतृत्त्वात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पातून देशाला नवी गती देण्यासाठी पुढाकार घेतला. देशातील मध्यम वर्ग, शेतकरी, उद्योग आणि युवकांसाठी अतिशय कल्याणकारी आणि सशक्त समाजाच्या निर्मितीला साथ देवून सर्वंकष विकास करणारा अर्थसंकल्प आहे, असेही बावनकुळे म्हणाले.

12 लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त करून अपेक्षेपलीकडे मध्यमवर्गीयांना अर्थसंकल्पातून दिलासा दिला. शेतकऱ्यांसाठी सुद्धा हा अर्थसंकल्प प्रचंड फायद्याचा ठरणार आहे. केंद्र सरकार राज्यांसोबत भागीदारीमध्ये धन धान्य योजना राबवणार आहे. कापूस विकासाकडे विशेष लक्ष्य देण्यात येणार आहे आणि किसान क्रेडिट कार्डची मर्यादा तीन लाखांवरून 5 लाख करण्यात आली आहे. उद्योग क्षेत्राला प्रचंड चालना देणारे हे बजेट आहे, असे बावनकुळे यांनी सांगितले.

महाराष्ट्र स्टार्टअपमध्ये देशात अग्रेसर आहे. आता स्टार्टअप साठी 10 हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. स्टार्टअपला मिळणाऱ्या कर्जातसुद्धा वाढ करण्यात आली आहे. याशिवाय मत्स्य उत्पादनाला चालना देण्यासाठी मोठी योजना प्रस्तावित आहे. दावोसमध्ये मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी 16 लाख कोटींचे करार केले आहेत. यामुळे महाराष्ट्रात प्रचंड गुंतवणूक होऊन इथला रोजगार मोठ्या पटीने वाढणार आहे. आता केंद्रीय अर्थसंकल्पाचीही याला साथ मिळाली असल्याचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT