Chandrakant Patil : सांगलीचा उडता पंजाबकडे प्रवास? पालकमंत्र्यांचे दोषींवर कारवाई आदेश

Sangli MD Drugs : सांगली जिल्ह्यात अनेक ठिकाणी अमली पदार्थांची निर्मितीसह कोठ्यावधींचा साठा सापडत आहे. यामुळे सांगलीचा उडता पंजाबकडे प्रवास सुरू आहे का अशीच चर्चा सध्या जिल्ह्यात सुरु आहे.
Chandrakant Patil On Sangli Drugs
Chandrakant Patil On Sangli DrugsSarkarnama
Published on
Updated on

Sangli News : केमिकल कंपनीच्या नावाखाली सांगलीत ड्रग तयार केले जात आहे. येथे कोट्यवधी रुपयांचा MD ड्रग्जचा साठा जप्त करण्यात आला असून पोलिसांनी अनेक ठिकाणी छापेमारी करत मुंबईपर्यंत असणारे रॅकेट उघड केलं आहे. तर या प्रकरणाचा तपास आता एलसीबीकडे देण्यात आला असून 30 कोटींच्या एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आला आहे. तसेच तिघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. यामुळे सांगलीचा उडता पंजाबकडे प्रवास सुरू आहे का? अशी विचारणा जिल्ह्यातील जनता करत आहे. दरम्यान सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकात पाटील यांनी यावर दोषींवर हयगय करू नका? दोषींवर कारवाई करा असे आदेश पोलिस दलाला दिले आहेत. यामुळे सांगली जिल्ह्यात आता ड्रगविरोधात लढाई अधिक तीव्र होणार आहे.

यावेळी चंद्रकांत पाटील यांनी, केवळ प्रबोधनाने जिल्ह्यातील ड्रग्जचा विषय संपणारा नसून पोलिस दलाने याप्रकरणी थेट कारवाई करावी. हयगय व कोणाची गय न करता दोषींवर कारवाई करण्याचे आदेश पालकमंत्री पाटील यांनी दिल्या आहेत. ते पोलिस मुख्यालयातील सभागृहात आयोजित जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या आढावा बैठकीत बोलत होते.

यावेळी सांगली पोलिस मुख्यालयातील सभागृहात आयोजित बैठकीस पोलिस अधीक्षक संदीप घुगे, उपाधीक्षक (गृह) दादासाहेब चुडाप्पा, मिरजचे उपधीक्षक प्रणील गिल्डा, सांगलीच्या उपाधीक्षक विमला एम. इस्लामपूरचे मंगेश चव्हाण, जतचे सचिन साळुंखे, तासगावचे सचिन थोरबोले, एलसीबीचे निरीक्षक सतीश शिंदे उपस्थित होते.

तसेच पाटील यांनी, अमली पदार्थांच्या दुष्परिणामाबाबत प्रबोधन व जनजागृती करणाऱ्या सामाजिक संस्थांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन करताना जनतेनं अलर्ट राहावे. जिल्ह्यातील ड्रग्जचे पाळेमुळे खोदून काढण्यासाठी पोलिस विभागाशी संपर्क साधून माहिती द्यावी, असेही म्हटले आहे. तर ड्रग्जविरोधी मोहिमेसाठी संकल्पना स्पष्ट करावी, त्याच्यासीठी सर्व खर्च जिल्हा नियोजन समिती किंवा ‘सीएसआर’मधून केला जाईल असे आदेश पोलिस दलास दिले आहेत.

Chandrakant Patil On Sangli Drugs
Chandrakant Patil : चंद्रकांत पाटील यांचे आश्वासन हवेत, वर्ष ओलांडूनही विद्यापीठाच्या उपकेंद्रासाठी ‘तारीख पे तारीख’

यावेळी पाटील म्हणाले, ‘अमली पदार्थमुक्त सांगली जिल्हा’ यावर अधिक लक्ष केंद्रित केले असून, याप्रकरणी पोलिस यंत्रणेने सतर्क राहावे. अमली पदार्थ तस्करी प्रकरणाची सखोल चौकशी करून मुळापर्यंत पोलिसांनी जावे.

सांगलीतील नशाबाजार मोडीत काढण्यासाठी हयगय न करता पोलिसांनी कडक करवाई करावी. कोणाचीही गय करू नये. सांगलीतील नशाबाजार मोडीत काढण्यासाठी समाजाची साथ महत्वाची असून महिती देणाऱ्यांना बक्षीस दिले जाईल. याबाबच आपण आधीच घोषणा केली आहे. यामुळे आता समाजानेच याच पुढाकार घ्यायला हवा.

Chandrakant Patil On Sangli Drugs
Chandrakant Patil Video : मोठी बातमी! धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणार? वरिष्ठ मंत्र्याने दिले संकेत

घाबरू नका, तक्रार द्या

अमली पदार्थांचे संकट घराच्या दारापर्यंत येऊन पोहोचले आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांनी देखील सजग राहून आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी काम करायला हवे. यामुळे सामान्य नागरिकांनी घाबरून न जाता तक्रार द्या, तक्रार देणाऱ्याच्या नावाबाबत गुप्तता पाळली जाईल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com