Chandrashekhar Bawankule : औरंगजेब याची ओळख पुसून टाकून छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव शहराला दिल्याने उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सेनेने खरेतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांचे अभिनंदन करायला पाहिजे. मात्र उद्धव सेना औरंगजेबाच्या वृत्तीत आले आहेत.
धर्म आणि मतांचे राजकारण करायला लागलेत. उद्धव आणि संजय राऊत यांना मानसिक आजार झाला आहे. दोघांनाही नागपूरच्या पागलखाण्यात भरती करण्याची वेळ आली आहे, अशा कठोर शब्दात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाकरेंवर प्रहार केला.
शिवसेनेच्या सकाळच्या टेप रेकॉर्डने कधीतरी विकासाच्या मुद्द्यावर बोलावे. उद्धव ठाकरे यांनी पुढचं भाषण विकासावर करून दाखवावे, असे आव्हानही भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी त्यांना दिले. लाडकी बहीण योजना लोकप्रिय ठरत असल्याने विरोधकांच्या पोटात दुखायला लागले आहे. बहिणीला पैसे मिळू नये, असे त्यांचे प्रयत्न आहेत. लाडकी बहीणमध्ये जनतेला पैसे मिळणार असेल, तर ते पैसे उद्धव ठाकरे, नाना पटोले, संजय राऊत यांच्या घरातून जाणार नाही. जनतेचा पैसा आहे, माझं याला समर्थन आहे. कितीही पैसे लागले तरी सरकारने मागे पाहू नये. शेतकऱ्यासाठी जे लागेल ते द्यावे. एक रस्ता कमी झाला तरी चालेल पण जनतेला पैसे कमी पडू नये आशी आमची भावना आहे, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले.
उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) खोटारडे आहेत. 24 महिने ते राज्याचे मुख्यमंत्री होते. ते दोन दिवसही मंत्रालयात गेले नाहीत. पेन नसलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या रूपाने महाराष्ट्राने बघितला आहे. देवेंद्र फडणवीस यांना चर्चेत राहण्यासाठी कुठलाही उपद्रव करण्याची गरज नाही. आरोप करणे ही त्यांची सवय नाही. ते प्रामाणिक काम करतात, असे सांगून उलट शरद पवार गटाचे लोक आणि अनिल देशमुख राजकीय लाभ घेण्यासाठी फडणवीस यांच्या नावाचा वापर करीत असल्याचा आरोप चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.
जनतेची दिशाभूल करीत आहे. दुसऱ्यावर आरोप करण्याऐवजी देशमुख यांनी होय मी नार्को टेस्टला तयार आहे, असे सांगावे. सचिन वाजे खोटं बोलत असेल, तर जनतेला नार्को टेस्टमधून कळू द्या. अनिल देशमुख यांनी आरोप प्रत्यारोप करण्याऐवजी चौकशी सामोरे जावे, असे देखी चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले.
शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांच्या कामासाठी शरद पवार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटले असतील. महाविकास आघाडीचे सरकार असताना आम्हीही सरकारला भेटत होतो. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले सरकार येण्याचे मुंगेरीलाके हसीन सपने बघत आहेत. महाविकास आघाडी ही भंगार कंपनी आहे. जनतेला हे माहीत आहे. राज्यात डबल इंजन सरकार येईल, असा दावा बावनकुळे यांनी केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.