Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस संतापले, बैठकीत आमदारांना केले गप्प!

DPC meeting Devendra Fadnavis : जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांमुळे आपल्या मतदारसंघातील कामे रोखून ठेवल्याचा आरोप आमदार मेघे यांनी केला. सोबतच सर्व कामांची चौकशी करा अशी मागणी फडणवीस यांच्याकडे केली.
Devendra Fadnavis
Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Devendra Fadnavis News : नागपूर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आज (शुक्रवारी) सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली. आमदारांनी एकमेकांवर आरोप केले. महायुती आणि महाविकास आघाडीच्या काळात झालेल्या कामांचे दाखले दिले. कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. त्यामुळे पालकमंत्री तसेच डीपीसीचे अध्यक्ष देवेंद्र चांगलेच संतापले. बैठकीचा आखडा करू नका. मी समितीचा अध्यक्ष, मला अध्यक्षच राहू द्या, माझा रेफ्री करू नका असे सांगून त्यांनी दोन्ही बाजूच्या आमदारांना गप्प बसवले.

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला रामटेकचे खासदार श्यामकुमार बर्वे, जिल्हा परिषद अध्यक्ष मुक्ता कोकड्डे यांच्यासह आमदार अनिल देशमुख, नितीन राऊत, समीर मेघे, आशिष जयस्वाल, कृष्णा खोपडे, परिणय फुके, टेकचंद सावरकर आदी उपस्थित होते. मेघे यांनी आपल्या हिंगणा मतदारसंघातील जलजीवन योजनेच्या कामाचा मुद्दा उपस्थित केला.

जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांमुळे आपल्या मतदारसंघातील कामे रोखून ठेवल्याचा आरोप त्यांनी मेघे यांनी केला. सोबतच सर्व कामांची चौकशी करा अशी मागणी फडणवीस यांच्याकडे केली. यावर खासदार बर्वे यांनी आरोप खोडून काढताना खुशाल चौकशी करा आम्ही कुठल्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार आहोत असे सांगताच खडाजंगीला सुरुवात झाली. यावरून वातावरण चांगलेच तापले होते.

Devendra Fadnavis
Video Devendra Fadnavis News : महायुती सरकारचा शेतकऱ्यांना दिलासा; विजबिलाबाबत ऊर्जामंत्री फडणवीसांची मोठी घोषणा

हे प्रकरण शांत होत नाही तोच डीपीसीच्या निधीवाटपावरून आरोप प्रत्यारोपाला सुरुवात झाली. महाविकास आघाडीचे आमदार अनिल देशमुख, अभिजित वंजारी यांनी डीपीसीचा निधी वाटप करताना भेदभाव केला जात असल्याचे सांगून समान निधी वाटपाची मागणी केली. भाजपचे आमदार कृष्णा खोपडे, टेकचंद सावरकर, समीर मेघे यांनी महाविकास आघाडीच्या कार्याकाळात काय झाले ते तपासून पाहण्याचा सल्ला त्यांना दिला.

आम्ही सर्वांना निधी देतो, मात्र आघाडीच्या कार्यकाळात भाजप आमदारांना एक रुपयासुद्धा देण्यात आला नाही, असा आरोप केला. यावरून पुन्हा शाब्दिक चकमकीला सुरुवात झाली. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी यात हस्तक्षेप करावा लागला.

हा राजकीय आखाडा नाही आणि मी रेफ्रीसुद्धा नाही असे सांगून त्यांनी जलजीवन योजनेत झालेल्या अनियमितता व घोटाळ्याची चौकशी करण्याचे आदेश दिले. या योजनेचे ऑडिट करून अहवाल त्वरित सादर करण्याचे निर्देश फडणवीस यांनी नागपूर जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना दिले.

Devendra Fadnavis
Crime News : माजी नगरसेवकाची रवानगी तुरुंगात, तब्बल दोन कोटी देण्याचे न्यायालयाचे आदेश!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com