Sharad Pawar, Adani and Chandrashekhar Bawankule Sarkarnama
विदर्भ

Chandrashekhar Bawankule News : उद्योगपती आणि राजकीय पुढाऱ्याची मैत्री असणे काही गैर नाही !

Nitin Deshmukh : आमदार नितीन देशमुख यांनी त्यांच्या मागणीसाठी आंदोलन जरूर करावे.

सरकारनामा ब्यूरो

Chandrashekhar Bawankule on Pawar-Adani Meeting : महाविकास आघाडीच्या काळात आंदोलन केल्यावर हजारो केसेस आमच्या कार्यकर्त्यांवर लावल्या होत्या, अशी आठवण भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी करून दिली. आमदार नितीन देशमुख यांनी त्यांच्या मागणीसाठी आंदोलन जरूर करावे. पण कुणाच्याही घरावर जाणे योग्य नाही, असे बावनकुळे म्हणाले. (But it is not appropriate to go to someone's house)

काल नागपुरात विचार परिवार व भाजप संघटन बैठक झाली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, कोणत्याही आंदोलनाचा शेवट पोलिसांकडून अटक करून किंवा आंदोलकांना ताब्यात घेऊन होतो. आंदोलकांची मागणी सरकारने पूर्ण केली पाहिजे, तपासली पाहिजे, ते काम सरकार करेल. कुणाच्या घरावर जाणे हे पोलिस कसे सहन करतील, असा प्रश्न त्यांनी केला.

खारघर प्रकरणात बोलताना आमदार बावनकुळे म्हणाले, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री संवेदनशील आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती ठीक नसतानाही ते परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहेत. जे नुकसान झाले ते भरून निघू शकणार नाही, कुटुंबाच्या मागे सरकारने व समाजाने उभे राहायला हवे, ते आम्ही करीत आहोत, असे सांगून त्यांनी संजय राऊतांना टोला लगावला.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उद्योजक अदानी यांची काल पवारांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानी भेट झाली. याबाबत विचारले असता, माझ्या माहितीप्रमाणे शरद पवार आणि गौतम अदानी यांचे कौटुंबिक संबंध आहेत, ते चांगले मित्र आहेत, राजकारणात व्यावसायिक मित्र असणे चुकीचे नाही. यात राजकारण होऊ नये.

याबाबत शरद पवार (Sharad Pawar) यांनी विस्ताराने सांगितले असून त्यांनी शरद पवारांनी जेपीसी समितीवर आपले मत व्यक्त केले आहे, असे सांगून त्याचा उच्चार केला. मुंबई विभागीय राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आज तारखेला होणाऱ्या कार्यकर्ता मार्गदर्शन शिबिर बैठकीत अजित पवारांचे नाव नसल्याविषयी बोलताना हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न असल्याचेही आमदार बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणाले.

विचार परिवार व भाजपच्या बैठकीत अनेक मुद्द्यावर चर्चा झाली. आदिवासी आणि वनवासी भागात केंद्र व राज्य सरकारच्या योजना समाजातील अखेरच्या व्यक्तीपर्यंत पोहचविण्यासाठी आम्ही काम करीत आहोत. सर्वांकडून माहिती घेणे व ती सरकारपर्यंत पोहचविणे हे आमचे काम आहे, असे सांगून आजच्या बैठकीचा कोणताही राजकीय संबंध नाही, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

केंद्र (Central Government)राज्य सरकारच्या (State Government) योजना अखेरच्या व्यक्तीपर्यंत पोहचिवण्यासाठी भाजप आदिवासी-वनवासी भागातील ६० हजार घरापर्यंत पोहोचणार आहोत, अशी माहिती चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT