Chandrashekhar Bawankule News: पण एकनाथ शिंदेंना तर मी नेहमी हसतानाच बघतोय..!

Eknath Shinde News: ते मातोश्रीवर केव्हा गेले, केव्हा रडले, केव्हा हसले, हे मला माहिती नाही.
Chandrashekhar Bawankule, Eknath Shinde and Aditya Thackeray
Chandrashekhar Bawankule, Eknath Shinde and Aditya ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Chandrashekhar Bawankule on Aditya Thackeray's Statement : आदित्य ठाकरेंनी गौप्यस्फोट केला की एकनाथ शिंदे मातोश्रीवर येऊन ढसाढसा रडले होते आणि भाजपमध्ये गेलो नाही, तर मला ते जेलमध्ये टाकतील. याबाबत आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांना विचारले असता, ते मातोश्रीवर केव्हा गेले, केव्हा रडले, केव्हा हसले, हे मला माहिती नाही. पण एकनाथ शिंदेंना मी नेहमीच हसताना बघतो आहे, असे ते म्हणाले. (I always see Eknath Shinde smiling)

आदित्य ठाकरे असे का बोलले ते मला माहीत नाही. त्यांचे त्यांनाच ठाऊक, असे सांगताना विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या भाजप प्रवेशाबाबतही त्यांनी भाष्य केले. ते म्हणाले, अजित पवार आणि त्यांच्या नेतृत्वावर काही प्रश्‍नचिन्ह लावणार नाही. पण या विषयाबद्दल मला काहीही माहिती नाही. महाविकास आघाडीच्या नागपुरात होत असलेल्या वज्रमूठ सभेबाबत आमदार बावनकुळे म्हणाले, सभेला भाजप विरोध नाही, तर स्थानिक नागरिकांचा आहे.

महाविकास आघाडीची सभा झाली पाहिजे, हे आमचे म्हणणे आहे. सभेमध्ये त्यांनी धोरणावर बोलावे, त्यांच्या पक्षाबद्दल बोलावे, सरकारच्या बाबतीत काय म्हणायचे आहे, ते बोलावे. आमच्या नेत्यांबद्दल व्यक्तिगत बोलू नये. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल फालतू वक्तव्य कुणी करू नये. असे झाले तर आम्ही सहन करणार नाही, असा इशारा आमदार बावनकुळेंनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना दिला.

भाजपचा सभेला विरोध नाही अशी भाजपची भूमिका असताना भाजपचेच आमदार कृष्णा खोपडे मात्र सभेसाठी मैदान द्यायला विरोध करीत आहेत. त्यांची ही भूमिका विसंगत नाही का, असे विचारले असता, कृष्णा खोपडे स्थानिक आमदार आहेत. आमदाराकडे नेहमी ५० लोक जात असतात आणि समस्या मांडत असतात. त्यावर आमदार संबंधित यंत्रणेला पत्र देतात, बोलतात. हे त्यांचे कामच आहे, असे आमदार बावनकुळे म्हणाले.

Chandrashekhar Bawankule, Eknath Shinde and Aditya Thackeray
Bawankule's Claim: शिंदेंनी बहुमत सिद्ध केलं तेव्हा १६४, आता १८४ आमदारांचा आकडा; बावनकुळेंचा दावा..

वाशीमचे (Washim) मोठे नेते अनंतराव देशमुख यांनी भाजपमध्ये (BJP) प्रवेश केलेला आहे. ते कॉंग्रेसमधील (Congress) एक मोठे नेतृत्व आहेत. आज तेथे २५ हजार कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. त्यासाठी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis)आणि मी वाशीममध्ये आहोत, असेही आमदार चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी सांगितले.

(Edited By - Atul Mehere)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com