Chandrashekhar Bawankule Sarkarnama
विदर्भ

Chandrashekhar Bawankule: महसूलमंत्री बावनकुळे अ‍ॅक्शन मोडवर; 'Raid'चा धडाका; अधिकाऱ्याच्या ड्राॅव्हरमध्ये आढळली रोकड, प्रशासनात खळबळ

Revenue Minister Chandrashekhar Bawankule News: नागपूर शहरातील खामला भागातील सह दुय्यम उपनिबंधक वर्ग 2 कार्यालयाबाबत पैसे घेतल्याशिवाय कुठलीच नोंदणी केली जात नसल्याच्या तक्रारी होत्या.

Rajesh Charpe

Nagpur News: महसूलमंत्री आणि नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी धाडींचा धडका लावला हे. या धाडसत्रात त्यांना महसूल विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या भूखंड खरेदी-विक्रीची नोंदणी करणाऱ्या सह दुय्यम उपनिबंधक कार्यालयातील एका अधिकाऱ्याच्याच ड्रॉव्हरमध्ये रोख रक्कम आढळली. त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी तत्काळ पोलिसांना याची माहिती देऊन तपास करण्याचे निर्देश दिले आहे.

विशेष म्हणजे यापूर्वी बावनकुळे यांनी सावनेर तालुक्यात दुय्यम निबंधक कार्यालयाला आकस्मिक भेट दिली होती. त्यावेळी या कार्यालयात एकही कर्मचारी उपस्थित नव्हता. नागपूर शहरातील खामला भागातील सह दुय्यम उपनिबंधक वर्ग 2 कार्यालयाबाबत पैसे घेतल्याशिवाय कुठलीच नोंदणी केली जात नसल्याच्या तक्रारी होत्या. याची दखल घेऊन बावनुकळे हे सोमवारी दुपारी थेट कार्यालयात धडकले. त्यामुळे एकच खळबळ उडाली

लपवाछपवीच्या आधीच त्यांना एका अधिकाऱ्याच्या टेबलच्या ड्रॉवरमध्ये रोख रक्कम आढळली. या रकमेचा आकडा त्यांनी जाहीर केला नाही. मात्र लाखाच्या घरात ही रक्कम असल्याची चर्चा आहे. त्यांनी पोलिसांना योग्य तो तपास करण्याचे निर्देश दिले.

नागरिकांना जर कोणत्याही शासकीय कामासाठी कोणी लाच अथवा इतर कशाची मागणी केल्यास थेट तक्रार करण्याचे आवाहन महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे.

राज्यात महसूल विभाग (Revenue Department) अधिक जबाबदार आणि जनतेसाठी सुलभ करण्यासाठी पुढील काही दिवसांत सर्व उपनिबंधक कार्यालयांवर विशेष तपास मोहिमा राबविण्याचे संकेत त्यांनी दिले. सर्वाधिक भ्रष्ट म्हणून महसूल विभाग ओळखला जातो. त्यातही भूखंड खरेदी-विक्रीच्या नोंदी करणारे दुय्यम निबंधक सर्वाधिक बदनाम आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT