Ramdas Kadam News : रामदास कदम यांचं टायमिंग चुकलं; बाळासाहेबांच्या निधनाचा मुद्दा शिंदेसेनेवरच शेकणार?

Ramdas Kadam’s Statement: दसरा मेळाव्यातील आरोपांनंतर कदम यांच्या ठाकरे सेनेतील नेते तुटून पडले. त्यांनी शेलक्या भाषेत कदम यांचा समाचार घेतला. आमदार अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेत कदम यांच्यावर हल्ला चढवला होता.
Ramdas Kadam addressing media as controversy brews over remarks linked to Balasaheb Thackeray and Eknath Shinde’s Shiv Sena.
Ramdas Kadam addressing media as controversy brews over remarks linked to Balasaheb Thackeray and Eknath Shinde’s Shiv Sena.Sarkarnama
Published on
Updated on

Balasaheb Thackeray’s Legacy at the Center of New Political Debate : शिवसेनेचे नेते रामदास कदम हे पक्षाच्या दसरा मेळाव्यापासून सातत्याने बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनाबाबत वादग्रस्त विधान करत आहेत. बाळासाहेबांचे पार्थिव दोन दिवस मातोश्रीत ठेवण्यात आल्याचा धक्कादायक दावा करत ते थेट उद्धव ठाकरेंना आव्हान देत आहेत. पण काल त्यांचा सूर थोडा मवाळ झाल्याचे दिसून आले. त्यावरून आता कदमांचे टायमिंग चुकल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यांच्या या विधानांचा फटका शिंदेसेनेला बसू शकतो.

शिवसेनेत फूट पडल्यानंतर ठाकरे आणि शिंदे यांची शिवसेना पहिल्यांदाच मुंबई महापालिकेच्या निवडणुकीला सामोरे जाणार आहे. यापार्श्वभूमीवर दोन्ही सेनांच्या दसरा मेळाव्यांना महत्व प्राप्त झाले होते. कोण काय बोलणार, याकडे सर्वांचे लागले होते. पण ठाकरे आणि शिंदे यांच्या भाषणापेक्षा सध्या रामदास कदम यांच्या भाषणावरूनच मोठा वाद निर्माण झाला आहे. बाळासाहेबांच्या निधनानंतर त्यांचे पार्थिव दोन दिवस मातोश्रीत ठेवण्यात होते. त्यांच्या हाताचे ठसे घेण्यात आल्याचा दावा कदम यांनी केला होता.

दसरा मेळाव्यातील आरोपांनंतर कदम यांच्या ठाकरे सेनेतील नेते तुटून पडले. त्यांनी शेलक्या भाषेत कदम यांचा समाचार घेतला. आमदार अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेत कदम यांच्यावर हल्ला चढवला होता. त्यांनीही कदम यांच्यावर अनेक गंभीर आरोप करत प्रत्युत्तर दिले. हे आरोप जिव्हारी लागलेल्या कदम यांनी रविवारी पत्रकार परिषद घेत परब यांच्यावर पलटवार केला. त्यांचा प्रमुख निशाणा ठाकरेंवर होता. पण अचानक पडद्यामागे काहीतरी हालचारी झाल्या अन् सोमवारी कदमांचा सूरच बदलला.

Ramdas Kadam addressing media as controversy brews over remarks linked to Balasaheb Thackeray and Eknath Shinde’s Shiv Sena.
Rajan Teli News : ठाकरेंची साथ सोडून शिंदेसेनेत गेलेल्या राजन तेलींचा 4 दिवसांतच धमाका; पहिला वार थेट राणेंवर...

लोकांची दिवाळी चांगली साजरी व्हावी, त्यांच्या घरातील कंदील विझता कामा नये म्हणून मी दोन दिवस पार्थिव मातोश्रीत ठेवले, असे उद्धव ठाकरे यांनी सांगावे. त्यावर मला काहीच म्हणायचे नाही, असे म्हणत रामदास कदम यांनी आरोपांची धार सौम्य केल्याचे सोमवारी पाहायला मिळाले. यामागे नेमके काय कारण, याचीच चर्चा आता रंगली आहे. एकीकडे कदम आरोप करत असताना त्यांच्या विधानांचे समर्थन करण्यासाठी किंवा पाठिंबा देण्यासाठी शिंदेंसह त्यांच्या पक्षातील कोणताही नेता पुढे आलेला नाही.

रामदास कदम या आरोपांबाबत एकाकी पडल्याचे चित्र आहे. मुंबईतील महापालिका निवडणुकांदरम्यान बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनाबाबत उलटसुलट विधाने करणे शिंदेंच्या पक्षाला महागात पडू शकते, याची जाणीव पक्षातील नेत्यांना झालेली असावी. शिवसेनेत फुट पडल्यानंतर कदम वगळता एकाही नेत्याने बाळासाहेबांच्या निधनाबाबतचा मुद्दा काढलेला नव्हता. या अत्यंत संवेदनशील मुद्द्यावर बोलत कदम यांनी पायावर धोंडा तर पाडून घेतला नाही ना, याची चर्चा आहे.

Ramdas Kadam addressing media as controversy brews over remarks linked to Balasaheb Thackeray and Eknath Shinde’s Shiv Sena.
Bihar Assembly Election : निवडणूक जाहीर होताच आला पहिला ओपिनियन पोल; राहुल-तेजस्वी जोडी ठरणार घातक?

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कदाचित ती जाणीव झालेली असावी. त्यांनीच कदम यांना आवरते घेण्याचा सूचना केल्या असाव्यात. आगामी निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्यासोबत राज ठाकरेही येणार असल्याचे जवळपास निश्चित आहे. त्याची भीती शिंदेंच्या शिवसेनेला नक्कीच असणार. ही युती झाल्यास सर्वाधिक फटका शिंदेंना बसू शकतो, असे राजकीय विश्लेषक सांगतात. त्यामुळे आधीच राजकीय धूर निघत असताना कदम यांच्या विधानांमुळे त्याला हवा मिळून भडका उडू शकतो. त्यामुळेच कदम वगळता अन्य कोणताही नेता त्यांच्यासोबत येताना दिसत नाही. त्यामुळे किमान निवडणूक होईपर्यंत आता कदम हा मुद्दा उकरून काढणार नाहीत, असे म्हणायला हरकत नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com