Chhagan Bhujbal sarkarnama
विदर्भ

Wardha Obc Sabha : छगन भुजबळांनी ओबीसींच्या सभेला जाणं टाळलं; पण चर्चा वेगळीच...

सरकारनामा ब्यूरो

Wardha : मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आंदोलन सुरू आहेतर, मराठा समाजाला आरक्षण द्या. पण ओबीसी आरक्षणाला धक्का लावू नका, असे सांगत छगन भुजबळ हे देखील मैदानात उतरले आहेत. महाराष्ट्रभर छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या नेतृत्वाखाली ओबीसींच्या सभा आयोजित केल्या जात आहेत. महाराष्ट्रभर या सभांना चांगला प्रतिसाद मिळत असताना वर्धाच्या ओबीसी मेळाव्याकडे मात्र ओबीसी बांधवांनी पाठ फिरवली. या सभेला छगन भुजबळ येणार होते. मात्र, तब्येतीचे कारण देत त्यांनी येणे टाळले. मात्र, या सभेला गर्दीच जमली नसल्याने भुजबळांनी या सभेकडे पाठ फिरवल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे.

सकल ओबीसी भटके विमुक्त संघटनेतर्फे सकाळी अकाराच्या सुमारास सभेचे आयोजन केले होते. मात्र, सभा सुरू होऊन तीन तास उलटले होती तरी छगन भुजबळ सभा स्थळी आलेच नाही. २५ हजार ओबीसी बांधव या सभेला येतील, अशी शक्यता आयोजकांनी वर्तवली होती.प्रत्यक्षात मात्र सभा स्थळी तुरळक गर्दी दिसून येत होती. वाढत्या उन्हामुळे सभेला आलेले नागरीक देखील निघून जात होते.

सभास्थळी आलेल्या नागरिकांमध्ये छगन भुजबळ येणार की नाही, याचीच चर्चा होती. व्यासपीठावर काही छगन भुजबळांची वाट पाहत बसले होते.या भागात काँग्रेस ओबीसी नेत्यांचे चांगले वजन आहे. ते सभेला गर्दी जमवतील अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र, ओबीसी सभा छगन भुजबळ हायजॅक करतील या भीतीपोटी काँग्रेसच्या ओबीसी नेत्यांकडून देखील या सभेला प्रतिसाद मिळाला नसल्याचे येथील काही नागरिक बोलत होते.

सभास्थळावरील ९० टक्के खुर्चा रिकाम्याच होत्या. भुजबळांची तब्येत ठीक नसल्याने ते डाॅक्टरांच्या सल्ल्यानंतर उद्या होणाऱ्या ठाणेतील सभेला जायचे की नाही, याची निर्णय घेणार असल्याची देखील सभास्थळी चर्चा होती. त्यामुळे वर्धाच्या सभेला येणाऱ्या नागरिकांमध्ये छगन भुजबळांच्या बाबतच चर्चा होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, ओबीसमधून मराठा आरक्षण देण्यासाठी मनोज जरांगे पाटील ठाम आहेत. त्यांनी सरकारला निर्णय घेण्यासाठी २४ डिंसेंबरपर्यंतची वेळ दिली होती. मात्र, आता एक आठवडा आधीच म्हणजे १७ डिसेंबरपर्यंत सरकाराने निर्णय घ्यावा, जरांग पाटील सांगत आहेत. मागणी मान्य न झाल्यास तिसऱ्या टप्यातील आंदोलन सुरू करण्याचा इशारा देखील जरांगे यांनी दिला आहे.

(Edited By Roshan More)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT