Chhagan Bhujbal News : होय, भुजबळांनी मोठमोठ्यांना अंगावर घेतले; पण स्वबळावर नव्हे; तर इतरांच्या...

Bhujbal Vs Jarange Patil : शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर भुजबळ यांना डॉ. पद्मसिंह पाटील यांनी आधार दिला होता.
Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbal Sarkarnama
Published on
Updated on

मी फार मोठमोठ्या लोकांना अंगावर घेतले आहे, तू किस झाड की पत्ती है....मनोज जरांगे पाटील यांच्या टीकेला मंत्री छगन भुजबळ यांनी अशा शब्दांत उत्तर दिले. भुजबळ म्हणाताहेत ती फार मोठे लोक कोण, असा प्रश्न पडतो. त्याचे उत्तर आहे, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार. विशेष म्हणजे, भुजबळानी या दोघांना स्वतःच्या बळावर नव्हे; तर इतरांच्या बळावर अंगावर घेतले होते.

शिवसेनेने सर्वकाही दिल्यानंतरही छगन भुजबळ (Chhagan Bhujbal ) यांनी शिवसेना सोडली होती. मंडल आयोगाला शिवसेनेचा विरोध होता, असे कारण त्यांनी दिले होते. नंतर ते त्याच शिवसेनेसोबत सत्तेत सहभागी झाले, मंत्रिपदे उपभोगली हा भाग वेगळा. भुजबळ यांनी शिवसेना सोडली, त्यावेळी परिस्थिती खूप वेगळी होती. शिवसेना (Shivsena) प्रचंड आक्रमक होती. शिवसेनेशी गद्दारी करणाऱ्याचे काही खरे नाही, अशी परिस्थिती होती. गद्दारी करणाऱ्यांबाबत शिवसैनिकांच्या भावना तीव्र असायच्या. त्यामुळे शिवसेनेतून बाहेर पडलेल्यांना काही दिवस तरी लपूनछपून राहावे लागायचे. भुजबळांची अवस्था अशीच झाली होती. भुजबळ शिवसेनेतून काही आमदारांसह बाहेर पडले आणि काँग्रेसमध्ये गेले. तेथे त्यांना मंत्रिपद मिळाले, मात्र भीती त्यांच्या मनातून गेली नव्हती.

वेगळा गट म्हणून मान्यता मिळण्यासाठी भुजबळ आणि त्यांच्यासोबतच्या शिवसेनेच्या 12 आमदारांना सभागृहात विधानसभा अध्यक्षांसमोर हजर राहणे आवश्यक होते. त्यावेळी विधीमंडळाचे नागपूर अधिवेशन सुरू होते. शिवसैनिक प्रचंड आक्रमक झाले होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनीही भुजबळ यांना धडा शिकवण्याचे आवाहन केले होते. त्यामुळे भुजबळ आणि त्यांच्यासोबतच्या आमदारांना विधीमंडळात न्यायचे कसे, असा गंभीर प्रश्न होता.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

तत्कालीन मंत्री, शरद पवारांचे (Sharad Pawar) विश्वासू सहकारी डॉ. पद्मसिंह पाटील यांनी ती जबाबदारी स्वतःहून आपल्या अंगावर घेतली. तरीही शिवसैनिक आक्रमकच होते. भुजबळ आणि आमदारांना विधीमंडळात न्यायच्या दिवशी डॉ. पद्मसिंह पाटील त्यांच्यासोबतच होते. शिवसेनेच्या घरातून बाहेर पडल्यानंतर पक्षाच्या मुंबईतील एका आमदाराने त्यांच्यावर पिस्तूल रोखले. डॉ. पाटील यांनी त्याला ढकलून दिले आणि सर्वजण पुढे निघाले.

या सर्वजणांनी ज्या पद्धतीने सभागृहात प्रवेश केला, ते पाहून सर्व आमदार अवाक्‌ झाले होते. कारण, शिवसेनेला चकवा देणे, त्याकाळी सोपे नव्हते. शिवसैनिकांना चकवा बसला होता, मात्र तो भुजबळांमुळे नव्हे; तर डॉ. पद्मसिंह पाटील यांच्यामुळे. त्यानंतरही भुजबळ अनेक दिवस डॉ. पाटील यांच्या निवासस्थानी राहिले. रात्री झोपेतून ते दचकून उठत असत. त्यावेळी डॉ. पाटील त्यांना धीर द्यायचे.

Chhagan Bhujbal
Salim Kutta News : सलीम कुत्ता कोण आहे? त्याला कुत्ता नाव कसे मिळाले?

मी मोठमोठ्या लोकांना अंगावर घेतले आहे, हे जे भुजबळ म्हणताहेत ते खरे आहे. मात्र त्यांनी या मोठ्या लोकांना स्वतःच्या बळावर अंगावर घेतले नव्हते. शरद पवार यांच्या बळावर त्यांनी मोठ्या लोकांना म्हणजे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अंगावर घेतले आणि डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या बळावर ते तरून गेले होते. मात्र, पुढच्या विधानसभा निवडणुकीत छगन भुजबळ यांना शिवसैनिकांनी धडा शिकवलाच. बाळा नांदगाकर यांनी भुजबळ यांचा दारूण पराभव केला होता.

Chhagan Bhujbal
Assembly Winter Session : राणेंच्या आरोपानंतर भुसे, शेलार आक्रमक; फडणवीसांनी केली SIT चौकशीची घोषणा

छगन भुजबळ यांनी शरद पवार यांच्या बळावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अंगावर घेतले होते. शिवसेना सोडून भुजबळांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर जेव्हा शरद पवार यांनी काँग्रेसमधून बाहेर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला, त्यावेळी भुजबळही पवारांसोबत आले. काही महिन्यांपूर्वी भुजबळ यांनी शरद पवारांचीही साथ सोडली आहे.

अजितदादा पवार यांनी बंडखोरी करून भाजपसोबत सत्तेत जाणे पसंत केले. भुजबळही त्यांच्यासोबत गेले आणि पुन्हा मंत्री झाले. ज्यांच्या बळावर भुजबळांनी बाळासाहेब ठाकरेंना अंगावर घेतले होते, त्या शरद पवारांचीही कालांतराने त्यांनी साथ सोडली. उद्धव ठाकरे हे बाळासाहेबांना अटक करणाऱ्या छगन भुजबळ यांच्या मांडीला मांडी लावून बसले; म्हणून आम्ही शिवसेना सोडली, असेही एक कारण एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतचे आमदार देत असतात, मात्र आता तेच भुजबळांच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत.

Chhagan Bhujbal
Nagpur Winter Session : बॉम्बस्फोटातील आरोपीसोबत ठाकरे गटाच्या नेत्याची पार्टी; राणेंनी विधानसभेत झळकावला फोटो

मराठा आरक्षण आंदोलन सुरू झाल्याच्या काही दिवसांनंतर मनोज जरांगे पाटील आणि ओबीसी नेत्यांमध्ये वाद सुरू झाला. मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण द्यावे, अशी मागणी झाल्यानंतर हा संघर्ष वाढला आहे. ओबीसी नेत्यांचा याला विरोध आहे. यावरून ओबीसी नेते, मंत्री छगन भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील हे एकमेकांवर शाब्दिक प्रहार करत आहेत. माझ्या नादी लागू नका, नाहीतर उरलेले केसही गळतील, अशी टीका जरांगे पाटील यांनी केली होती. त्याला भुजबळांनीही लागलीच प्रत्युत्तर दिले. मी फार मोठमोठे लोक अंगावर घेतले आहेत, तू किस झाड की पत्ती, असे भुजबळ म्हणाले.

Chhagan Bhujbal
Assembly Winter Session : पहिल्याच मिनिटांत जाधवांनी सरकारला चूक कबूल करायला लावले...फडणवीसांनीही मान्य केले...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com