Vijay Wadettiwar and Bhagatsingh Koshyari Sarkarnama
विदर्भ

छत्रपती शिवराय स्वयंभू होते, त्यांना कोणत्याही गुरुजी गरज नव्हती…

या विषयात त्यांनी (Bhagatsingh Koshyari) घूमजाव केले, पण माफी अद्याप मागितलेली नाही. त्यांनी तमाम जनतेची माफी मागावी, असेही मंत्री वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) म्हणाले.

सरकारनामा ब्यूरो

नागपूर : इतिहासात सर्व धडे शिवाजी महाराजांवर आहेत, महारांच्या गुरूंवर एकही धडा नाही. राज्यपाल महोदयांचा अभ्यास हिमालयातील आहे, तिकडे प्रत्येकाला गुरू लागत असावा. पण आमच्या राजांना गुरूची गरज नव्हतीच. त्यामुळे स्वामी समर्थ रामदास यांच्याशिवाय शिवाजी महाराजांनी कुणी विचारत नाही. हे वक्तव्य चुकीचे आहे आणि महाराजांचा अपमान करणारे आहे, असे म्हणत राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी राज्यपालांच्या वक्तव्याचा समाचार घेतला.

छत्रपती शिवराय (Chhatrapati Shivaji Maharaj) स्वयंभू होते. त्यांना कोणत्याही गुरूची गरज नव्हती. काही परप्रकाशित असतात, तर काही स्वयंप्रकाशित असतात. महाराज हे स्वयंप्रकाशित होते. त्यामुळे त्यांना गुरूची गरज नव्हती. आज जगातील कितीतरी विद्यापीठात महाराजांवर अभ्यास केला जातोय. त्यामुळे राज्यपाल महोदयांचं (Bhagatsingh Koshyari) वक्तव्य तमाम शिवप्रेमींच्या भावना दुखावणारे आहे. या विषयात त्यांनी घूमजाव केले, पण माफी अद्याप मागितलेली नाही. त्यांनी तमाम जनतेची माफी मागावी, असेही मंत्री वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) म्हणाले.

गंगा वाहून जाऊ नये..

केंद्र सरकारने ॲापरेशन गंगा सुरू केलं, पण ते वाहून जाता कामा नये. आपल्या विद्यार्थ्यांना परत आणण्याचे काम केंद्र सरकारने सर्वप्रथम केले पाहिजे. विदेशातील दुतावासांनी पाहिजे तशी मदत केली नाही, असा मुलांचा आरोप आहे. पोलंडचे दूतावास प्रतिसाद देत नसल्याचेही काही विद्यार्थ्यांनी आम्हाला टोल फ्री नंबरवर सांगितले. २५-३० हजार लोकांमधून फक्त ९०० लोकांना परत आणण्‍यात आले आहेत, ही काही फार मोठी कामगिरी नाही. त्यामुळे केंद्र सरकारने आत्ताच आपली पाठ थोपटून घेऊ नये. नाटोमध्ये भारताने युक्रेनचे समर्थन न केल्यामुळे तो देश आपल्या मुलांना मदत करत नाहीये.

भारताने वेळीच पावले उचलायला हवी होती..

युक्रेनमध्ये जेव्हा युद्धजन्य परिस्थिती होती. युद्धाची शंका व्यक्त केली जात होती, तेव्हा इतर देशांनी १५ दिवसांपूर्वीच आपल्या लोकांना तेथून परत आणले. पण आपल्या देशाकडून असं पाऊल उचललं गेलं नाही. माध्यमांनीही याबाबतीत वेळोवेळी वृत्त दिलेले होते. त्यामुळे भारत सरकारने तेव्हाच पावले उचलायला पाहिजे होती. पण आपल्या केंद्र सरकारने अशी कुठलीही कार्यवाही केलीच नाही. किमान सूचना देऊन युक्रेनमध्ये असलेल्या विद्यार्थ्यांना शेजारच्या देशांमध्ये आश्रय घेण्यासाठी जरी सांगितले असते, तर आज ही परिस्थिती उद्भवली नसती आणि आज हजारो मुलामुलींना या संकटाला सामोरे जावे लागले नसते.

‘त्या’ विद्यार्थ्यांची माथी भडकवण्यात आली होती..

महाज्योतीच्या संदर्भात १०-१२ विद्यार्थी मला भेटले. त्यातील ७ विद्यार्थ्यांचा महाज्योतीशी काहीही संबंध नव्हता. ३१ हजार रुपयांच्या स्कॉलरशीप साठी केवळ ५ विद्यार्थ्यांचं काही म्हणणं होतं. पण नंतर त्यांनी येऊन मला सांगितलं की, आमचीही काही चूक नव्हती. कारण आमची माथी भडकवली गेली होती. तेव्हा त्यांना आम्ही सांगितलं की, सारथीमध्ये तेवढी रक्कम देतात. पण त्यांची संख्या कमी असते. तुलनेत ओबीसींची संख्या खूप जास्त आहे. त्यामुळे रक्कम तात्काळ वाढविता येणे शक्य नाही. ही चर्चा बबनराव तायवाडे यांच्यासमोर झाली आणि ही बाब त्या विद्यार्थ्यांच्याही लक्षात आली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT