Eknath Shinde, Devendra Fadnavis, Chandrashekhar Bawankule Sarkarnama
विदर्भ

Assembly Election 2024 : CM शिंदेचा ‘स्ट्राईक रेट'चा फॉर्म्युला भाजपला अमान्य?

Chandrashekhar Bawankule On CM Eknath Shinde's Statement : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जागावाटपात ‘स्ट्राईक रेट' हे सूत्र पुढे करून महायुतीच्या नेत्यांना अडचणीत टाकले आहे. विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसला याचा सर्वाधिक फटका बसू शकतो. त्यामुळे महायुतीच्या नेत्यांवर आता खुलासे करण्याची वेळ आली आहे.

Rajesh Charpe

Nagpur News, 16 Sep : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी जागावाटपात ‘स्ट्राईक रेट' हे सूत्र पुढे करून महायुतीच्या नेत्यांना अडचणीत टाकले आहे. विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसला याचा सर्वाधिक फटका बसू शकतो. त्यामुळे महायुतीच्या नेत्यांवर आता खुलासे करण्याची वेळ आली आहे.

भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी 'स्ट्राईक रेट'ला थेट विरोध केला नसला तरी त्यांनी जिंकून येण्याची क्षमता यालाच आमचे प्राधान्य राहणार असल्याचे स्पष्ट केले. यावेळी त्यांनी महायुतीचा फॉर्म्युला तीनही पक्षांचे नेते पत्रकार परिषद घेऊन जाहीर करणार असल्याचे सांगितले.

लोकसभेची निवडणूक महायुतीने एकत्रित लढली होती. असे असताना भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसला निवडणुकीत मोठा फटका बसला. राष्ट्रवादीचे एकच खासदार निवडून आला तर शिंदे सेनेचे सर्वाधिक खासदार निवडूनआले आहेत.

त्यामुळे आता शिंदे सेनेच्यावतीने विधानसभेच्या निवडणुकीत स्ट्राईक रेटचा मुद्दा पुढे करून विधानसभेच्या निवडणुकीत अधिकाधिक जागा आपल्या पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न आहे. याकरिताच मुख्यमंत्री शिंदे वारंवार स्ट्राईक रेटचा मुद्दा पुढे करीत असल्याचे सांगण्यात येते. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनासुद्धा स्ट्राईक रेटचे सूत्र अमान्य असल्याचे दिसून येते.

जागावाटपावर बोलताना बावनकुळे म्हणाले, महायुतीचे नेते एकत्रित बसून जागा वाटाचा निर्णय घेणार आहेत. जिंकणे हाच महत्त्वाचा मुद्दा जागा वाटप करताना राहणार आहे. आमचे 70 जगांवर एकमत झाले आहे. लवकरच महायुतीचे नेते एकत्रित पत्रकार परिषद घेणार आहे. महाविकास आघाडीपूर्वी महायुतीचा फॉर्म्‍युला आपल्या सर्वांनाच दिसेल असेही त्यांनी सांगितले.

सध्या भाजपच्या सर्व्हेचा मुद्दाही चांगलाच चर्चेत आला आहे. याबाबत वेगवेगळे दावे केले जात आहेत. भाजपला मोठा फटका बसणार असल्याचे सांगण्यात येत आहे. असे असले तरी बावनकुळे यांनी असा काही सर्वे झाला असल्याचे फेटाळून लावले आहे.

अमरीश पटेल हे तुतारी वाजवणार अशी चर्चा केली यावर बोलताना बावनकुळे म्हणाले, घरी आलेल्या पाहुण्यांचे स्वागत करण्याची परंपरा आपली आहे. शरद पवार (Sharad Pawar) यांना पुष्पगुच्छ दिले म्हणजे ते तुतारी हाती घेणार असे होत नाही.

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे अडीच वर्षे महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री होते. तेव्हा त्यांनी कधी पेंशनचा विषय काढला नाही. आता ते खोटे बोलत आहेत. विधासभेची निवडणूक आली असल्याने जनतेची दिशाभूल करीत असल्याचा आरोपही चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT