abhijeet wanjari-sudhakar kohale Sarkarnama
विदर्भ

Nagpur MLC Election: अभिजीत वंजारींनी 4 हजार 700 मतांचं लीड तोडलं: भाजपच्या कोहळेंवरती 2400 मतांची आघाडी; अद्याप 10 हजार मतांची मोजणी बाकी

MLC Election Results 2026: नागपूर पदवीधर मतदारसंघाची निवडणुकीची मतमोजणी तब्बल 30 तासांपासून सुरु आहे. सुधाकर कोहळेंच्या विजयी जल्लोषाची तयारी भाजपसह त्यांच्या समर्थकांकडून सुरू करण्यात आली होती. मात्र, या निवडणुकीत पुन्हा एकदा मोठा ट्विस्ट निर्माण झाला आहे. या निवडणुकीत आता कोहळेंची आघाडी घटली असून ते पिछाडीवर पडले आहेत.

Deepak Kulkarni

Nagpur News: नागपूर पदवीधर निवडणुकीत भाजप उमेदवार सुधाकर कोहळे आणि काँग्रेस उमेदवार अभिजित वंजारी यांच्यात काँटे की टक्कर सुरू आहे. याचदरम्यान, आता भाजपच्या कोहळे यांची मतांची आघाडी घटली असून अभिजीत वंजारी यांनी मतांचं लीड तोडलं असून 2400 मतांची आघाडी घेतल्याची माहिती समोर येत आहे. या नव्या ट्विस्टमुळे भाजपची धाकधूक वाढल्याचं समोर येत आहे. अद्यापही नागपूर पदवीधर निवडणुकीत तब्बल 10000 मतमोजणी बाकी असल्याची माहिती समोर येत आहे.

नागपूर पदवीधर मतदारसंघाची निवडणुकीची मतमोजणी तब्बल 30 तासांपासून सुरु आहे. एकीकडे भाजपच्या सुधाकर कोहळेंच्या विजयी जल्लोषाची तयारी त्यांच्या समर्थकांकडून सुरू करण्यात आली होती. मात्र, आता या निवडणुकीत पुन्हा मोठा ट्विस्ट निर्माण झाला आहे. या निवडणुकीत आता कोहळेंची आघाडी घटली ते पिछाडीवर पडले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा बालेकिल्ला असलेल्या नागपूरमध्येच विधानपरिषदेच्या निवडणुकीत भाजपची प्रचंड दमछाक झाली आहे. बुधवारी सायंकाळनंतर कोहळे यांचं 4 हजार मतांची आघाडी कमी झाली. ती 1200 पर्यंत खाली होती. मात्र,आता नव्या अपडेटनुसार, काँग्रेसच्या आशा पुन्हा एकदा पल्लवित झाल्या असून वंजारी यांनी निर्णायक आघाडी घेतल्याचं समोर येत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा भाजपच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे. मतमोजणी दरम्यान मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत.

नागपूर पदवीधर मतदारसंघाची निवडणूक अत्यंत चुरशीची होताना दिसून येत आहे.या निवडणुकीत बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून हकालपट्टी झालेल्या नितेश कराळे गुरुजींनी 24000 पेक्षा जास्त मतं घेतली आहे.कराळे गुरुजी हे नागपूर मतदारसंघाच्या निवडणुकीत गेमचेंजर ठरण्याची शक्यता आहे.

नागपूर पदवीधर मतदारसंघातील मतमोजणीच्या दोन्ही फेरीनंतर 1 लाख 50 हजार 874 मते वैध ठरली आहेत. त्यामुळे 75 हजार 438 मताचा विजयाचा कोटा निश्चित करण्यात आला आहे. दोन्ही उमेदवारांना तेवढी मते पडलेली नाहीत. पहिल्या फेरीत काँग्रेसच्या अभिजीत वंजारी यांनी आघाडी घेतल्याचं दिसून आलं होतं. नंतर दुसरी फेरीअखेर भाजपच्या सुधाकर कोहळे 4,291 मतांनी आघाडीवर आल्याचं दिसून आलं होतं. पहिल्या फेरीच्या मतमोजणीत कोणत्याही उमेदवाराने विजयाचा कोटा पूर्ण केला नाही.

या निवडणुकीसाठी एकूण 60 टक्के मतदान झालं होतं. चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली भागात  71 टक्क्यांहून अधिक मते मिळाली होती. ही निवडणूक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे या तिघांनी हातात घेतली होती. जोरदार प्रचारात करत कोहळेंच्या विजयासाठी पोषक वातावरण निर्मिती करण्यात यश आल्याचं चित्र होतं. तसेच फडणवीसांना भाजपमधील बंडखोरी रोखण्यातही अपयश आलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT