PM Modi News: चार मोठ्या राज्यांच्या विधानपरिषदेच्या 28 जागांसाठी बॅलेट पेपरवर निवडणुका; काँग्रेसनं किती जागा जिंकल्या? पंतप्रधान मोदींनी डिवचलं

BJP Vs Congress: विधान परिषदेच्या उत्तर प्रदेश,बिहार,महाराष्ट्र आणि कर्नाटक या चार राज्यांतील 28 जागांसाठी झालेल्या निवडणुकांचे निकाल आणि कल 28 ऑक्टोबर 2026 रोजी समोर आले आहेत. या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्ष (BJP) आणि त्यांच्या मित्रपक्षांनी अनेक ठिकाणी आघाडी घेतली आहे.
PM Modi And Rahul Gandhi
PM Modi And Rahul GandhiSarkarnama
Published on: 
Updated on: 

New Delhi News: काँग्रेसचा उत्तर प्रदेश,महाराष्ट्र,बिहार आणि कर्नाटक या चार राज्यांमधील 28 विधान परिषद (MLC) जागांच्या निवडणुकीत पूर्णपणे धुव्वा उडाला आहे. या निवडणुका बॅलेट पेपरचा वापर करून घेण्यात आल्या होत्या. याच निवडणुकांमध्ये भाजपनं जोरदार मुसंडी मारताना विजय खेचून आणले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चार राज्यांतील 28 मतदारसंघाच्या निकालानंतर सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.या पोस्टमधून त्यांनी काँग्रेसला डिवचलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी(ता.28) चार राज्यांतील 28 मतदारसंघाच्या निकालानंतर सोशल मीडियावर ट्विट केलं आहे. आपल्या पोस्टमध्ये मोदींनी लिहिलं आहे की,"4 मोठ्या राज्यांतील 28 जागांवर विधान परिषद निवडणुका पार पडल्या. उत्तर प्रदेश,महाराष्ट्र,बिहार आणि कर्नाटक या राज्यांच्या निवडणुका बॅलेट पेपरद्वारे घेण्यात आल्या. ओळखा पाहू ,काँग्रेसनं किती जागा जिंकल्या?"अशा शब्दांत पंतप्रधान मोदींनी बॅलेटपेपरवर निवडणुका घेण्याची मागणी करणाऱ्या काँग्रेसला खोचक टोला लगावला आहे.

विधान परिषदेच्या उत्तर प्रदेश,बिहार,महाराष्ट्र आणि कर्नाटक या चार राज्यांतील 28 जागांसाठी झालेल्या निवडणुकांचे निकाल आणि कल 28 ऑक्टोबर 2026 रोजी समोर आले आहेत. या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्ष (BJP) आणि त्यांच्या मित्रपक्षांनी अनेक ठिकाणी आघाडी घेतली आहे. तर चारही राज्यांमध्ये सत्ताधारी काँग्रेस पक्षाला पराभवाचा मोठा धक्का बसल्याचं चित्र आहे.

कर्नाटकमध्ये भाजप-जेडीएस युतीने चारही जागांवर विजय मिळवत सत्ताधारी काँग्रेस पक्षाचा धुव्वा उडवला आहे. भाजपने पश्चिम पदवीधर, दक्षिण-पूर्व पदवीधर आणि उत्तर-पूर्व शिक्षक मतदारसंघाच्या जागा जिंकल्या, तर जेडीएसने बंगळुरू शिक्षक मतदारसंघावर विजय मिळवला. काँग्रेसला येथे एकही जागा जिंकता आली नाही.

PM Modi And Rahul Gandhi
Marathwada Election Results: सतीश चव्हाणांची चौथ्या टर्मची आमदारकी हिरावली, पराभूत उमेदवाराने सांगितला प्रतापसिंहांच्या विजयामागचा 'चाणक्य' कोण..?

उत्तर प्रदेशमधील विधान परिषदेच्या 11 जागांसाठी (5 पदवीधर आणि 6 शिक्षक मतदारसंघ)मतमोजणी पार पडली. यात भाजपने आघाडी घेत अनेक जागांवर विजय मिळवला. त्यात मेरठ-बरेली मतदारसंघातून डॉ. हरिसिंह ढिल्लों आणि लखनऊ शिक्षक मतदारसंघातून उमेश द्विवेदी यांच्या विजयाचा समावेश आहे. तर समाजवादी पक्षानेही (SP) काही जागांवर विजय मिळवला आहे.

बिहारमधील आठ जागांपैकी पाटणा शिक्षक मतदारसंघातून राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) डॉ. संजीव यांनी विजय मिळवला आहे. तिरहुत शिक्षक मतदारसंघातून भाजपचे नरेंद्र सिंह विजयी झाले, तर दरभंगा शिक्षक मतदारसंघातून प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’ पक्षाने विजय मिळवत विधान परिषद निवडणुकीत खाते उघडले आहे.

PM Modi And Rahul Gandhi
Pune Graduate Election: पुणे पदवीधरमध्ये 'भाजप'ची यंत्रणा सपशेल फेल : हर्षदा जाधवांच्या विजयाने पश्चिम महाराष्ट्रातून सर्वात मोठ्या पक्षाला धोक्याची घंटा

महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या पाच जागांसाठी झालेल्या निवडणुकांची मतमोजणी सुरू आहे. या निवडणुकीच्या निकालात सध्यातरी महायुती 03 आणि महाविकास आघाडी (MVA) 2 जागांवर विजयी होणार असल्याचं चित्र सध्या आहे. यात भाजपनं 2 आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं 1 जागा मिळवली आहेत. तर महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षानं पुणे आणि मराठवाडा पदवीधर अशा दोन जागांच्या निवडणुका जिंकल्या आहेत.

काँग्रेससह विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडी तसेच महाराष्ट्रातील महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या नेत्यांकडून सातत्यानं ईव्हीएम मशिनवर संशय घेतला जात असून मतचोरीचा आरोपही केला जात आहे. याच मुद्द्याला धरुन विरोधकांकडून बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याबाबतची मागणी केली जात आहे.

PM Modi And Rahul Gandhi
MLC Election : महाराष्ट्राच्या राजकारणात भल्याभल्यांना जमला नाही, तो 'प्रताप' सख्या भावांनी करुन दाखवला; 'पदवीधर'मध्ये उधळला गुलाल, तिसऱ्या जोडीची विधिमंडळात एन्ट्री

मात्र, काही दिवसांपूर्वी गुजरातमध्ये झालेल्या निवडणुका आणि आता चार मोठ्या राज्यांच्या विधान परिषद निवडणुका ज्या बॅलेट पेपरवर घेण्यात आल्या होत्या.त्यात काँग्रेसला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com