Youth Congress Sarkarnama
विदर्भ

Youth Congress : काँग्रेसने युवक प्रदेशाध्यक्षपदाची निवडणूक टाळली; शिवराज मोरेंची केली थेट नियुक्ती, कुणाल राऊतांचे स्वप्न भंगले

Maharashtra Congress News : कुणाल राऊत यांनी पुन्हा एकदा युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होण्याची तयारी केली होती. मात्र, आता त्या पदावर शिवराज मोरे यांची नियक्ती करण्यात आली आहे.

Rajesh Charpe

Nagpur, 01 August : युवक काँग्रेसने पक्षांतर्गत निवडणूक टाळून युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षाच्या नावाची थेट घोषणा केली आहे. सातारा जिल्ह्यातील कऱ्हाडचे शिवराज मोरे यांची युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. माजी प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांचा कार्यकाळ संपला होता. प्रभारी असतानाही त्यांनी अनेकांना निलंबित केले होते. काहींना पदावरून बरखास्त केले होते, त्यामुळे काँग्रेस पक्षात कुणाल राऊत यांच्याविरोधात मोठा असंतोष निर्माण झाला होता. हे बघून वरिष्ठांनी काही महिन्यांपूर्वी मोरेंकडे कार्याध्यक्षपद सोपविले होते. राऊत यांची आता काँग्रेसच्या प्रदेश कार्यकारिणीत महासचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

राज्यात महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका दिवाळीनंतर होण्याची शक्यता आहे. सरकारकडून तशी तयारी करण्यात येत आहे. निवडणुकीची शक्यता गृहीत प्रदेश युवक काँग्रेसची (Youth Congress) निवडणूक घेण्यात आली नसल्याचा दावा केला जात आहे. शिवराज मोरे यांच्याकडे पूर्णवेळ अध्यक्षपद सोपवण्यात आले आहे, त्यामुळे आता जुनी कार्यकारिणीही आपसूकच बरखास्त होणार आहे. त्यानंतर युवक काँग्रेसची नवीन कार्यकारिणी जाहीर केली जाणार आहे.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना नितीन राऊत ऊर्जा विभागाचे मंत्री होते. याच कार्यकाळात युवक काँग्रेसची निवडणूक जाहीर झाली होती. त्यांचे चिरंजीव कुणाल राऊत हे युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी निवडून आले होते. युवक काँग्रेसचा कार्यकाळ संपत आला असताना कुणाल राऊत (Kunal Raut) यांनी अनेकांना निलंबित केले होते. त्यावरून मोठा वाद झाला होता.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयासमोर युवक काँग्रेसकडून आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनात जे सहभागी झाले नाहीत, त्यांच्यावर निष्क्रियतेचा ठपका ठेवण्यात आला होता. मात्र, अध्यक्षपदाच्या स्पर्धेत असलेल्या पदाधिकाऱ्यांना राऊत यांनी मुद्दामहून निलंबित केल्याचा आरोप करण्यात आला होता.

निलंबितांमध्ये विजय वडेट्टीवार यांची मुलगी शिवानी वडेट्टीवार, आमदार विकास ठाकरे यांचा मुलगा केतन ठाकरे यांचाही समावेश होता. याची तक्रार दिल्लीपर्यंत झाली होती. पक्षाच्या घटनेनुसार कारवाई केली नसल्याचा दावाही करण्यात आला होता.

दोन वेळा निलंबनाचे प्रकार झाल्यानंतर युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांनी कार्याध्यक्षपदी शिवराज मोरे यांची नियुक्ती करून कुणाल राऊत यांचे पंख छाटले होते. कुणाल राऊत यांची आता प्रदेश कार्यकारिणीत नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच, शिवराज मोरे यांना युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष करण्यात आल्याने कुणाल राऊत यांचे आता पुन्हा एकदा युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होण्याचे स्वप्न भंगले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT