Youth Congress Politics : राऊतांनी पोरखेळ बंद करावा; 'युवक काँग्रेस'मध्ये वादाला तोंड फुटलं...

Youth Congress state president Kunal Raut RSS Mohan Bhagwat Nagpur : नागपूरमधील युवक काँग्रेस पदाधिकाऱ्यांवर पदमुक्तची कारवाई झाल्याने दोन गट पडले असून, एकमेकांवर आरोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत.
Youth Congress Politics 1
Youth Congress Politics 1Sarkarnama
Published on
Updated on

Nagpur News : युवक काँग्रेसच्या पाच डझन पदाधिकाऱ्यांना पदमुक्त केल्याने आता पुन्हा नव्या वादाला तोंड फुटले आहे.

प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांचा पोरखेळ सुरू आहे. त्यांच्या निर्णयामुळे संघटनेची बदनामी होत असल्याचा आरोप युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.

सरसंघचालक (RSS) मोहन भागवत यांच्या विरोधात आंदोलन करण्याचा निर्णय तीन वेळा बदलण्यात आला होता. ज्या दिवशी आंदोलन ठरले होते, त्यादिवशी प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत शहरात नव्हते. त्यामुळे आंदोलनासाठी दुसरा दिवस निवडण्यात आला. आधी सकाळी आंदोलन करण्याचे ठरले होते. मात्र नंतर वेळेत पुन्हा बदल करण्यात आला आणि पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सायंकाळचा निरोप देण्यात आला. त्यामुळे अनेक जणांनी मेसेज बघितले नाही, अनेकांना आंदोलनाची वेळ बदलल्याची कल्पनाच नव्हती.

Youth Congress Politics 1
Shivsena News : उद्धव ठाकरे ॲक्शन मोडवर; शिवसेनेच्या सर्व जिल्हाप्रमुखांना 24 जानेवारीला मुंबईत बोलावले

एवढेच नव्हे तर युवक काँग्रेसचे (Congress) राष्ट्रीय महासचिव बंटी शेळके मध्य नागपूर विधानसभा मतदारसंघात राहतात. त्यांचे घर संघ मुख्यालयाजवळच आहे. त्यांनी विधानसभेची निवडणूकसुद्धा लढली आहे. मध्यच नव्हे तर शहरभर त्यांचे कार्यकर्ते आहेत. मात्र त्यांनाही आंदोलनाची माहिती देण्यात आली नव्हती. त्यामुळे आंदोलन फसले. केवळ 50 कार्यकर्तेच सहभागी झाले होते.

Youth Congress Politics 1
Chhagan Bhujbal : छगन भुजबळांचा 'नवसंकल्प'; राजकारणाच्या 'युद्धात अन् तहा'त जिंकायचंच!

प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांना हे अपेक्षितच होते. त्यांना युवक काँग्रेसमधून काही जणांना हटवायचेच होते. त्यांनीच यादी तयार करून राष्ट्रीय अध्यक्षांना दिली. नेमक्या त्याच लोकांवर कारवाई केली. यापूर्वीसुद्धा कुणाल राऊत यांनी, अशाच पद्धतीने कारवाई केली होती. त्यांच्यावर गंडातर येण्याची शक्यता दिसतात नंतर त्यांनी आपलाचा आदेश मागे घेतला, असा आरोप पदमुक्त करण्यात आलेल्या युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केला.

काँग्रेस राष्ट्रीय पक्ष आहे. युवक काँग्रेस ही या पक्षाची प्रमुख शाखा आहे. कुठलाही निर्णय घ्यायचा असेल आणि कारवाई करायची असले, तर मार्गदर्शक तत्त्वे आणि नियमावली आहे. मात्र त्याचा विचार करण्यात आला नाही. कारवाई करण्यापूर्वी कारणे दाखवा नोटीस बजावून, म्हणणे ऐकूण घ्यावे लागते. प्रदेशाध्यक्षांना साधा हा नियम माहीत नसावा हे खरे वाटत नाही. हेतुपरस्पर कारवाई करायची असल्याचे त्यांनी पदमुक्त करण्याच आदेश काढला.

या त्यांच्या आदेशामुख काँग्रेसची बदनामी होत आहे. वारंवार असे आदेश काढले जात असल्याने प्रदेशाध्यक्षांचे हसे होत असल्याचे पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. पदमुक्त करण्यात आलेल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांमध्ये शहर काँग्रेसचे अध्यक्ष विकास ठाकरे यांचे चिरंजीव केतन ठाकरे, माजी विरोधी पक्षनेते व आमदार विजय वडेट्टीवार यांची मुलगी शिवानी वडेट्टीवार, माजी आमदार अशोक धवड यांचे चिरंजीव अभिषेक धवड यांचा समावेश आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com