Nagpur News : नागपूर महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची आघाडी झाली होती. तीनही पक्षाच्या नेत्यांनी यास दुजोरा दिला होता. जागा वाटपाचा आकडाही ठरला होता. राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या जागा वाटपाच्या प्रस्तावावर दोन्ही पक्षाच्या शहराध्यक्षांनी स्वाक्षऱ्या केल्या होत्या. मात्र, मंगळवारी सकाळी सर्व चित्रच बदलले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची (NCP) चांगलीच धांदल उडाली. हे सर्व काँग्रेसने ठरवून केले, त्यांचे भाजपशी साटेलोटे असल्याची शंका राष्ट्रवादीने व्यक्त केली आहे.
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला नऊ जागा देण्याचा निर्णय झाला होता. पूर्व नागपूर आणि उत्तर नागपूरमधील जागेवर दोन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये शाब्दिक वादही झाले होते. उद्धव सेनेने दोन नगरसेवक असलेल्या आणि मागील निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या जागा देण्याची मागणी केली होती. पूर्व आणि उत्तर नागपूर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस नेत्यांचा विरोध डावलून त्यास मान्यता देण्यात आली होती. त्यानुसार संबंधित उमेदवारांना उद्धव सेनेच्यावतीने तिकीट पक्के झाल्याचा निरोपही दिला होता
उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी तयारीत राहण्याच्या सूचनाही देण्यात आल्या होत्या. काही जागा वाढवून मागण्यासाठी आज पुन्हा काँग्रेस नेत्यांसोबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र ही बैठक फिस्कटली. काँग्रेसने (Congress) राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे सेनेला आघाडी करणार नाही असे स्पष्टच सांगून टाकले. त्यामुळे आघाडीच एकच अस्वस्थता निर्माण झाली.
राष्ट्रवादी व उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या कार्यालयात धावून घेऊन तातडीने उमेदवारी अर्ज भरायला लावले. हा गोंधळ काँग्रेसने मुद्दाम घातला. उद्धव ठाकरे व राष्ट्रवादीच्या उमेदवारांना उमेदवारी अर्ज भरता येऊ नये यासाठी बोलणी आणि बैठकांमध्ये गुंतवून ठेवले यासाठी काँग्रेसने खेळी करण्याचा आरोप केला जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसने समविचारी पक्षासोबत आघाडी करून निवडणूक लढण्याचे आधी ठरवले होते. भाजपला रोखण्यासाठी आम्ही काँग्रेससोबत आघाडी करण्याचा निर्णय घेतला. मात्र काँग्रेस जे केले ते बघता भाजपची बी टीम काँग्रेसच असल्याचा थेट आरोप राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष शैलेंद्र तिवारी यांनी केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.