Beed News: बीड भाजपमध्ये नवा-जुना वाद पेटला, माजलगावमध्ये हमरी तुमरी,तर झेडपी इच्छुकांच्या मुलाखतीचं ठिकाण बदलण्याची वेळ!

Beed Election News: माजी मंत्री व ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी तर शनी शिंगणापूरनंतर भाजपच्याच घराला दरवाजे नसल्याने कोणीही येत आहे, मात्र त्यांनी हे घर आमचेच आहे, असे म्हणू नये अशी अपेक्षा असल्याचे म्हटले.
Dr. Yogesh Kshirsagar Stand In beed Municipal Council Election News
Dr. Yogesh Kshirsagar Stand In beed Municipal Council Election NewsSarkarnama
Published on
Updated on

Beed News : सत्ता मिळविणं आणि ती टिकविण्यासाठी दुसऱ्या पक्षातून नेत्यांना आयात करण्याची परंपरा भाजपमध्ये चांगलीच रुढ झाली आहे. वरिष्ठ नेत्यांच्या निर्णयांमुळे स्थानिक आणि निष्ठावंतांना तोंड दाबुन बुक्क्यांचा मार सहन करावा लागतो आणि जयजयकारही करावा लागतो. पण, अलिकडे महापालिकेच्या तोंडावर नेत्यांच्या आयातीकरणामुळे रडापडीपासून नेत्यांना घेराव घालण्याच्याही घटना राज्यभरात समोर आल्या. याचे पडसाद बीड (Beed) जिल्ह्यातही उमटले.

माजलगावमध्ये वरिष्ठांसमोर हमरी- तुमरी आणि बीडमध्ये मुलाखतीचे ऐनवेळी ठिकाण बदलणं ही दोन ताजी उदाहरणं समोर आली आहेत. सरत्या आठवड्यात राज्य भाजपचे संकटमोचक गिरीश महाजनांना अशा आयातीकरणामुळे घेराओ आणि आमदार देवयानी फरांदेंचे अश्रू ढाळणं राज्यानं पाहिलं. सोलापूरला भाजपमध्ये नव्यानं आलेल्यांना उमेदवार दिली तर आम्ही निष्ठावंत कुठूनही लढले तरी त्यांचा प्रचार करु, अशी थेट भूमिका भाजप आमदार सुभाष देशमुख यांनी घेतली.

माजी मंत्री व ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी तर शनी शिंगणापूरनंतर भाजपच्याच घराला दरवाजे नसल्याने कोणीही येत आहे, मात्र त्यांनी हे घर आमचेच आहे, असे म्हणू नये अशी अपेक्षा असल्याचे म्हटले. यावरुन नव्यांची एंट्री निष्ठावंतांना कशा जखमा देतेय, हे सहज लक्षात येते. अशी सुरुवात आता बीड भाजपमध्येही सुरु झाली आहे. नगर पालिका निवडणुकीत भाजपने पाच ठिकाणी तगडे पॅनल उभा केले. मात्र, पंकजा मुंडेंनी (Pankaja Munde) स्वत:च्या परळीत मात्र युती केली.

पण, बीडमध्ये क्षीरसागरांना तर गेवराईत पवार व पंडितांनी घेतले. धारुरमध्ये निर्मळांची एंट्री झाली. माजलगामध्येही नवा - जुना प्रयोग झाला. निकाल काही असे काही तसे लागले, पण, नव्यांमुळे निष्ठावंतांचे दुखणे समोर यायला सुरुवात झाली आहे. माजलगावमध्ये जिल्हा परिषद इच्छुकांच्या मुलाखतीवेळी थेट जिल्हा पदाधिकाऱ्यांसमोर कार्यकर्ते व नेत्यांचीच जुंपली. बीडमध्ये निवडणुकीची सुत्रे नव्याने एन्ट्री झालेल्या डॉ. क्षीरसागरांकडे होती. नगराध्यक्षपदाची उमेदवारीही ऐनवेळी एंट्री झालेल्या डॉ. घुमरेंना मिळाली. त्यामुळे वर्षानुवर्षे देव पाण्यात ठेवलेल्या निष्ठावंतांचा हिरमोड झाला.

Dr. Yogesh Kshirsagar Stand In beed Municipal Council Election News
Latur Election: राष्ट्रवादीत आलेल्या काँग्रेसच्या 'बी' टीमकडून मीठाचा खडा! भाजप आमदार संभाजी पाटील निलंगेकरांचा आरोप

निकालात भाजपचे 15 नगरसेवक विजयी झाले असले तरी यात जगदीश गुरखुदे एकमेव निष्ठावंत भाजपचे. निवडणुकीच्या बहुतांश प्रक्रीया भाजप जिल्हा कार्यालयातून घडल्या. पण, निकालानंतर गटनेता निवड क्षीरसागरांच्या संस्था कार्यालयात झाली. त्यानंतर रविवारच्या इच्छुकांच्या मुलाखतीही त्यांच्याच संस्थेच्या महाविद्यालयात ठेवल्या गेल्या. ही बाब निष्ठावंतांना खुपली आणि याचा अंतर्गत इश्‍यू झाला. त्यामुळे वेगवान घडामोडी झाल्या आणि या मुलाखतीचे ठिकाण बदलून एका हॉटेलात गेले.

Dr. Yogesh Kshirsagar Stand In beed Municipal Council Election News
Shiv Sena BJP Alliance : पुण्यात भाजपकडून 'युतीचं गाजर'; शिवसेना कार्यकर्त्यांच्या पाठीमागं लागला 'चकवा' : भरलेले अर्ज मागे घेण्याची नामुष्की ओढावणार?

त्यामुळे ही वरकरणी छोटी वाटत असली तरी जुन्या -नव्यातील अस्वस्थतेची सुरवात आहे. जिल्ह्यात भाजपमध्ये पंकजा मुंडे यांची ताकद असल्याने त्यांचा वरचष्मा असला तरीही एक निष्ठावंत भाजपची फळी कार्यरत आहेच. त्याचाच भाग म्हणजे जिल्हाध्यक्षपदी शंकर देशमुखांची नियुक्ती हे त्याचे मोठे उदाहरण आहे. आता होणाऱ्या निवडणुकीत नव्या - जुन्यांत ताळमेळाची कसोटी नेते कशी पेलतात? हे पहावे लागणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com