Congress  Sarkarnama
विदर्भ

Congress leader trouble : काँग्रेसच्या बड्या नेत्याचे टेन्शन वाढले; आमदारकी धोक्यात? कोर्टाने बजावला समन्स

Congress News : विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज आणि प्रतिज्ञापत्रासाठी त्यांनी आपल्या पत्नीच्या नावाने घेतलेला स्टँप पेपर वापरला आहे. हा वापर बेकायदेशीर असल्याने त्यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे.

Rajesh Charpe

Nagpur News : काँग्रेस पक्षाच्या विधिमंडळाचे नेते विजय वडेट्टीवार यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने समन्स बजावला आहे. ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज आणि प्रतिज्ञापत्रासाठी त्यांनी आपल्या पत्नीच्या नावाने घेतलेला स्टँप पेपर वापरला आहे. हा वापर बेकायदेशीर असल्याने त्यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे.

ब्रह्मपुरी येथील परिवर्तन महाशक्ती संयुक्त आघाडी, प्रहार जनशक्ती पक्ष, स्वाभिमानी पक्ष, स्वतंत्र भारत पक्षाचे उमेदवार ॲड. नारायण जांभुळे यांनी ही उपरोक्त याचिका दाखल केली आहे. या प्रकरणावर न्यायमूर्ती प्रवीण पाटील यांच्यासमक्ष सुनावणी झाली. याचिकेनुसार, ब्रह्मपुरी विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे (Congress) उमेदवार विजय वडेट्टीवार यांचा उमेदवारी अर्ज आणि शपथपत्र निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवर अपलोड करण्यात आले आहे.

विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी दाखल केलेल्या या प्रतिज्ञापत्रात वापरलेला स्टॅम्प पेपर त्यांच्या नावाचा नसून त्यांच्या पत्नीच्या नावे आहे. वडेट्टीवार यांच्या पत्नीने हा स्टॅम्प पेपर ‘करारनामा’साठी घेतला होता. मात्र, या स्टॅम्प पेपरचा वापर नव्या अक्षरात ‘प्रॉमिसरी नोट’ लिहून करण्यात आला आहे. ही घटनात्मक फसवणूक असल्याचा दावा याचिकाकर्त्याने केला आहे.

एका व्यक्तीच्या नावाने खरेदी केलेला स्टॅम्प पेपर दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर वापरता येत नाही. त्यामुळे, वडेट्टीवार यांचे प्रतिज्ञापत्र अवैध ठरवण्यात यावे व त्यांची नामनिर्देशन याचिका रद्द करण्यात यावी, अशी विनंती याचिकेतून करण्यात आली आहे. वडेट्टीवार यांना २५ एप्रिलपर्यंत उत्तर दाखल करायचे आहे. याचिकाकर्त्यांतर्फे ॲड. जांभुळे यांनी स्वतः बाजू मांडली.

निवडणूक आयोगाने फेटाळली होती याचिका

वडेट्टीवारांचा उमेदवारी अर्ज रद्द करा, अशी विनंती करणारी याचिका निवडणुकी पूर्वीच उमेदवार ॲड. जांभुळे यांनी दाखल केली होती. परंतु, हा मुद्दा निवडणूक याचिकेतून दाखल होणे अपेक्षित होते, असे निरीक्षण न्यायालयाने त्यावेळी नोंदविले होते.

(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT