Nagpur Political News : मराठा आरक्षण मिळावे, या मागणीसाठी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला होता. यासंदर्भात माहितीच्या अधिकारात काही मुद्दे पुढे आल्यानंतर विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी मंगळवारी (ता. २१) नागपूर येथे त्यावर भाष्य केले.
मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज कोणी केला, हे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) बघतील असे ते म्हणाले. आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज करणे ही बाब अयोग्य आहे. आपण या घटनेचे समर्थन करू शकत नाही, असे वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले. (Congress Leader & Leader Of Opposition Vijay Wadettiwar Demands Inquiry On Lathi Charge on Martha Protesters at Antarwali Sarati)
मराठ्यांवर लाठीचार्ज निषेधाची बाब आहे. तो काही कौतुकास्पद विषय नाही. परंतु तो नेमका कुणी केला, हे जरांगे पाटील शोधून काढतील किंवा सरकार त्याबद्दल खुलासा करेल. अंतरवाली सराटी येथील पोलिसांनी केलेला लाठीचार्ज दुर्दैवी होता, असं आपलं ठाम मत आहे. हे कृत्य टाळता आलं असतं. एवढं मोठं आंदोलन सुरू असताना सरकारला त्याबद्दल कळत नाही आणि स्थानिक पातळीवर अधिकारी निर्णय घेत असतील, तर हे सरकारचं अपयश आहे.
अंतरवाली सराटी येथील अधिकारी व सरकार मराठा आंदोलन हाताळण्यात पूर्णपणे अयशस्वी ठरलं. लाठीचार्ज झाल्यानंतर आंदोलन आणखी पेटलं. सरकारला हेच पाहिजे होतं का, असा सवालही वडेट्टीवार यांनी केला. पोलिसांनी महिलांवर अमानुष हल्ला केला. पोलिसांनाही दुखापत झालं. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची निवृत्त न्यायाधीशामार्फत चौकशी झाली पाहिजे. सरकार ती करणार नसेल, तर नागपुरातील हिवाळी अधिवेशनात यासंदर्भात आवाज उठविणार असल्याचं वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलं.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
धानाला तत्काळ बोनस द्यावा
धानाला बोनस द्यावा ही मागाणी अनेकांची आहे. धानाचं पीक निघालं आहे. शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात धान व्यापाऱ्यांना विकले आहे. संपूर्ण धान व्यापाऱ्यांनी उचलल्यावर सरकार बोनस देण्याची घोषणा करणार आहे का? सरकारला आताही घोषणा करता आली असती. मात्र, केवळ वेळ काढूपणा केला जात आहे, असा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला. सरकारच्या तिजोरीत ठणठणाट आहे. त्यांच्याजवळ पैसाच नाही. आतापर्यंत केवळ उधळपट्टी केल्यानं तिजोरीत पैसा राहणार कसा? त्याचा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे, असं ते म्हणाले.
सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकरी, शेतमजुरांची, बेरोजगारांची दिवाळी अंधारात गेली आहे. काम करणाऱ्या अनेक एजन्सींचे पैसे मिळालेले नाहीत. 10 ते 12 हजार कोटी एजन्सींना घेणे आहे. त्यांची बिलं थकली आहेत. कंत्राटदारापर्यंत रक्कम पोहाेचली असती तर ती मजुरापर्यंत गेली असती. तसे न झाल्यानं सरकारने सगळ्यांची दिवाळी काळी केली आहे, असे वडेट्टीवार म्हणाले.
Edited by : Atul Mehere
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.