Nagpur Assembly : अधिवेशनासाठी नागपुरात तयारी जोरात; सेंट्रल हॉलचाही प्रस्ताव

Winter Session 2023 : दहा दिवसांनंतर उपराजधानीत येणार सचिवालय
Vidhan Bhavan Nagpur
Vidhan Bhavan NagpurGoogle

Government in Orange City : उपराजधानी नागपूर येथे दरवर्षी होणाऱ्या विधिमंडळ हिवाळी अधिवेशन सुरू व्हायला अद्याप अवकाश असला तरी सचिवालयाचं कामकाज सुरू व्हायला अवघे दहा दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळं विधानभवनात तयारीला वेग देण्यात आलाय. विधानभवनाची रंगरंगोटी, विधानसभा अध्यक्ष, विधान परिषदेचे सभापती, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, सर्व मंत्री, अधिकाऱ्यांच्या दालनाची स्वच्छता करण्यात येत आहे.

आमदार निवास, रवीभवन, मुख्यमंत्री निवास, उपमुख्यमंत्री निवास, मंत्री व अधिकाऱ्यांचे बंगले यांचीदेखील रंगरंगोटी व दुरूस्तीचं काम सध्या युद्धपातळीवर केलं जात आहे. (Preparations For Winter Session of Maharashtra State Assembly Session 2023 at Nagpur on Toes)

सरकारनं जाहीर केल्यानुसार सध्या केवळ दोन आठवड्यांसाठी अधिवेशनाचं वेळापत्रक ठरविण्यात आलं आहे. दोन आठवड्यांपेक्षा अधिक काळासाठी अधिवेशन घेण्यात यावं अशी मागणी होत आहे. यासंदर्भात लवकरच एका बैठकीत होण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीनं प्रशासन कामाला लागलं आहे. सद्य:स्थिती महत्त्वाच्या फाइल्स व दस्तऐवज नागपुरात आणले जात आहेत.

विधानभवनाचा विस्तार करणार असल्याचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मागच्या अधिवेशनात सांगितले होते. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रस्तावही दिला आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपुरात घेण्यासाठी सेंट्रल हॉलचा अडथळा येत होता. हा अडथळा आता दूर होणार आहे. सेंट्रल हॉलसोबतच दोन भव्य इमारतींचा प्रस्तावही सार्वजनिक बांधकाम विभागानं सादर केला आहे. विधानसभा व विधान परिषदेत भविष्यातील सदस्य संख्यावाढ लक्षात घेता बैठक व्यवस्था तयार करण्यात येणार आहे. १५ माळ्यांची इमारतही येथे उभारण्याचा प्रस्ताव आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे हा प्रस्ताव सादर करण्यात आला. या बांधकामासाठी सुमारे एक हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे. विधानभवनाच्या नूतनीकरणासाठी पक्ष कार्यालय, ग्रंथालय व इतर बांधकाम पाडावं लागणार आहे. याच जागेवर सेंट्रल हॉलची उभारणी प्रस्तावित आहे. सेंट्रल हॉलची उभारणी पूर्ण झाल्यानंतर उपराजधानी नागपुरातही अर्थसंकल्पीय अधिवेश घेणे शक्य होणार आहे. नागपूरला उपराजधानीचा दर्जा आहे. आतापर्यंत येथे केवळ हिवाळी अधिवेशन घेण्यात येते. केवळ बोटांवर मोजण्याइतक्या वेळीच पावसाळी अधिवेशन नागपुरात घेण्यात आलंय. अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपुरात घेण्यात यावं, ही मागणी अनेकदा झालीय. परंतु सेंट्रल हॉल नसल्याची अडचण या अधिवेशनाला आडवी येत होती. विधान भवनाच्या नूतनीकरणामुळं आता ही अडचणही दूर होणार आहे. विशेष म्हणजे नागपुरातील विधान भवनाचं नूतनीकरण स्वतंत्र विदर्भाची मागणी करणाऱ्यांसाठी आशेचा एक नवा किरण निर्माण करणारा विषय ठरणार आहे.

Edited by : Prasannaa Jakate

Vidhan Bhavan Nagpur
Nagpur Politics : फडणवीसांच्या गडात काँग्रेसचे अतुल लोंढे यांच्या नावानं फलकबाजी

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com