Mukul Wasnik and Nana Patole Sarkarnama
विदर्भ

Mukul Wasnik and Nana Patole : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुकुल वासनिकांची पटोलेंना 'ही' विशेष सूचना, म्हणाले...

Rajesh Charpe

Vidhan Sabha Election 2024 : आगामी विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसने महिलांना 33 टक्के आरक्षणाचा मुद्दा आपल्या अजेंड्यावर घेतला आहे. उमेदवारी देतानाही महिलांना प्राधन्य देण्याचा विचार काँग्रेसतर्फे केला जाणार आहे.

हाच धागा पकडून काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव मुकुल वासनिक यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना एक सल्ला दिला. महिला इच्छुकांच्या अर्जाचा निरपेक्षपणे विचार करण्याची त्यांनी सूचना केली. हे बघता यंदाच्या निवडणुकीत काँग्रेसतर्फे तिकीट वाटप करताना महिलांना प्राधान्य देण्यात येईल अशी शक्यता वर्तविली जात आहे.

काँग्रेसच्यावतीने गुरुवारी नागपूर येथून विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा बिगुल वाजवला गेला. बदलापूर, बंगाल येथे झालेल्या महिलांवरील अत्याचाराच्या निषेधार्थ आंदोलन केले गेले. याकरिता महिला काँग्रेसच्या(Congress) राष्ट्रीय अध्यक्ष अलका लांबा खास नागपूरला आल्या होत्या.

विशेष म्हणजे आंदोलनात सहभागी झालेल्या सर्व महिलांना गुलाबी रंगाचे कापडे घालून येण्याची सूचना केली होती. नागपूर येथून सुरू झालेले गुलाबी वादळ देशभरात पसरले आणि भाजपची खुर्ची डळमळीत करेल असा दावा यावेळी काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव मुकुल वासनिक(Mukul Wasnik) यांनी केला. आंदोलनात सहभागी झालेल्या सर्वच नेत्यांनी आपल्या भाषणात महिलांच्या राजकीय आरक्षणाचा उल्लेख केला.

तर चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांनी राजकारणात महिलांचे खच्चीकरण केले जात असल्याचा आरोप केला. सोबतच त्यांनी महिलांना राजकारणात बरोबरीचे स्थान देण्याची मागणी केली. हाच धागा पकडून मुकुल वासनिक यांनी नाना पटोले यांना विधानसभेच्या निवडणुकीत तिकीट वाटप करताना महिलांना प्राधन्य देण्याची सूचना केली.

ते म्हणाले, 'नानाभाऊ (Nana Patole) विधानसभा निवडणुकांसाठी पुरुष आणि महिलांच्या अर्जांना निरपेक्ष पद्धतीने तपासा. मी असे म्हणत नाही की महिलांना ग्रेस मार्क द्या. मात्र त्यांच्या कामाचा निरपेक्ष विचार करा.' असे झाले तर मोठ्या संख्येने महिलांना विधानसभेसाठी काँग्रेस पक्षाची उमेदवारी मिळू शकेल.

वासनिक काँग्रेसचे बडे नेते आहेत. गांधी परिवाराच्या जवळचे आहेत. त्यांनी केलेली सूचना ही गांधी परिवार यांच्याकडूनच आली असल्याची शक्यात असल्याने विधानसभेच्या निवडणुकीत महिलांना मोठ्याप्रमाणात उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT