Video Congress Politics : ठाकरेंच्या मुंबईत पटोलेंची खेळी, शिवसेनेच्या मिशनला काँग्रेसचाच धक्का ?

Congress assembly Election Uddhav Thackeray : मुंबईतील जागांच्या संदर्भात नुकतीच महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक संपन्न झाली. या बैठकीत काँग्रेसकडून 17 पेक्षा अधिक जागांवर दावा केल्याची माहिती आहे.
Uddhav Thackeray Nana Patole
Uddhav Thackeray Nana Patolesarkarnama
Published on
Updated on

Congress Politics : 2014 आणि 2019 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसकडून लढण्यास कोणी फारसे उत्सुक नव्हते. मात्र, यंदा नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली लढलेल्या लोकसभा निवडणुकीपासून काँग्रेसला अच्छे दिन आले आहेत.

राज्यात तब्बल 288 जागांसाठी काँग्रेसकडे 1500 अर्ज आले आहेत. विशेष म्हणजे ठाकरेंची ताकद असणाऱ्या मुंबईतील 36 विधानसभा मतदारसंघातून तब्बल 226 इच्छुकांचे अर्ज काँग्रेसकडे आले आहेत.

मुंबईतील मतदारसंघांवरून काँग्रेस-ठाकरे गटात रस्सीखेच सुरू आहे. 36 पैकी 20 ते 22 मतदारसंघावर ठाकरे गटाने दावा सांगितला आहे. मात्र, काँग्रेसमधील इच्छुकांची संख्या पाहता येथे ठाकरे गटाच्या मिशनला काँग्रेसकडून धक्का लागण्याची शक्यता आहे.

Uddhav Thackeray Nana Patole
Rajkot Fort Statue Collapse : 'एकदा नाही शंभरवेळा डोकं ठेवायला मी तयार' ; शिंदेंनी मागितली माफी!

मुंबईतील जागांच्या संदर्भात नुकतीच महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक संपन्न झाली. या बैठकीत काँग्रेसकडून 17 पेक्षा अधिक जागांवर दावा केल्याची माहिती आहे. तर, शरद पवार गट देखील सहा ते सात जागा मागतो आहे. मित्र पक्षांकडून येवढ्या जागांची मागणी होत असेल तर शिवसेना ठाकरे गट मुंबईत 20 ते 22 जागांवर कसा लढणार हे प्रश्न चिन्हच आहे.

सर्व्हे काँग्रेसच्या बाजुने

काँग्रेसने नुकताच अंतर्गत सर्व्हे केला. या सर्व्हेनुसार काँग्रेसला 80 ते 85 जागा मिळत आहेत. तर ठाकरे गट 30 जागांवर येतो आहे. शरद पवार गटाला ठाकरे गटापेक्षा जास्त जागा मिळत असल्याचे काँग्रेसच्या सर्व्हेमध्ये दिसत आहे. त्यामुळे आत्मविश्वास वाढलेल्या काँग्रेसकडून जास्तीत जास्त जागांची मागणी केली जाऊ शकते.

सर्वाधिक अर्ज विदर्भातून

288 मतदारसंघातून काँग्रेसकडे 1500 अर्ज आले आहेत.त्यामध्ये सर्वाधिक अर्ज हे विदर्भातून आले आहेत. विदर्भातील 62 जागांसाठी तब्बल 470 इच्छुकांचे अर्ज आले आहेत. उत्तर महाराष्ट्र 47 जागांसाठी 138 तर मराठवाड्यात 46 जागांसाठी 285 इच्छुकांचे अर्ज आले आहेत.

Uddhav Thackeray Nana Patole
Congress Politics : आत्मविश्वास वाढलेली काँग्रेस उत्तर महाराष्ट्रात चमत्काराच्या तयारीत?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com