Maharashtra Political News: लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजल्यापासून राज्याच्या राजकारणात अनेक अनपेक्षित घडामोडी घडत आहेत. विविध पक्षातील वरिष्ठ नेते आपला पक्ष बदलताना दिसत आहेत. नुकतेच अशोक चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केल्यामुळे काँग्रेसला धक्का बसला होता. अशातच आता काँग्रेसला आणखी एक धक्का बसेल असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मंत्री धर्मराव बाबा आत्राम (Dharmarao Baba Atram) यांनी केला आहे.
काँग्रेस (Congress) नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) 4 जूननंतर भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याचा दावा येणार असल्याचा दावा धर्मराव बाबा आत्राम (Dharmarao Baba Atram) यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्यामुळे राजकीय चर्चांणा उधाण आलं आहे. महायुतीच्या सभेत बोलताना आत्राम यांनी हे वक्तव्य केलं आहे. या सभेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अशोक चव्हाण (Devendra Fadnavis And Ashok Chavan) हे देखील उपस्थितीत होते.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar) यांच्या संदर्भात केलेल्या दाव्यामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ माजली आहे. शिवाय 4 जूननंतर म्हणजे लोकसभेचा निकाल लागल्यानंतर वडेट्टीवर भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांणा आता उधाण आलं आहे. 4 जूननंतर विरोधी पक्षनेते आमच्यामध्ये येऊन बसतील. भाजपमध्ये प्रवेश करतील. गडचिरोली काँग्रेसचे अनेक नेते भाजपमध्ये का आले? त्यांच्याकडे पैसे नाहीत म्हणून त्यांना तिकीट दिलं नाही. आदिवासी माणूस गरीबच राहणार आहे लखपती थोडीच होणार असंही आत्राम यांनी म्हटलं आहे.
बाबा आत्राम यांच्या दाव्यावर विजय वडेट्टीवार यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. तसेच आपण काँग्रेस सोडून कुठेही जाणार नसल्याचं वडेट्टीवार यांनी सांगितलं आहे. वडेट्टीवार म्हणाले, गडचिरोली मतदारसंघ हा काँग्रेसमय झाला असून या मतदारसंघात भाजपचा पराभव दिसत आहे. भाजपचा पराभव झाला तर धर्मराव बाबा यांचे मंत्रीपद जाईल, म्हणून ते माझ्यावर खोटे आरोप करत आहेत असं वडेट्टीवार म्हणाले.
ते पुढे म्हणाले, धर्मराव आत्राम यांना माझे आव्हान आहे, त्यांनी त्यांच्या मतदारसंघात भाजपला (BJP) लीड मिळवून द्यावे. शिवाय त्यांच्यापुढे मी जाणार अशी चर्चा झाली तर आत्राम यांची नार्को टेस्ट करा,असं आव्हानचं वडेट्टीवारांनी दिलं. शिवाय तुम्हाला उद्या उमेदवारी मिळणार का माहित नाही, लोकसभेत तुमची गोची केली. तिथे जाऊन गुलाम होऊन जगत आहेत. दुसऱ्याला बदनाम करु नका. स्वतः बेईमानी करायची, पक्ष फोडायचे, पाप करायचे त्यावर पांघरूण घालण्यासाठी दुसऱ्याला बदनाम करायचे, हे बिनबुडाचे आरोप आहेत असा हल्लाबोल वडेट्टीवारांनी केला.
(Edited By Jagdish Patil)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.