Varsha Gaikwad News : 'मी नाॅट रिचेबल नव्हते अन् नाराजही नाही पण...' ; गायकवाडांची खदखद आली बाहेर!

Lok Sabha Election News : मुंबईमध्ये आमच्या काँग्रेस पक्षाची अनेक ठिकाणी संघटनात्मक ताकद चांगली आहे. हा मुद्दा लक्षात घेऊन जागावाटप होणं गरजेचं होतं, असं वर्षा गायकवाडांनी म्हंटलं होतं.
Varsha Gaikwad News
Varsha Gaikwad News Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष वर्षा गायकवाड यांनी आपण नाराज नाही, असं म्हटलं आहे. मुंबई शहरातील लोकसभेच्या सहापैकी एकच जागा काँग्रेसच्या वाट्याला गायकवाड नाराज असल्याची चर्चा होती. आपण नाराज नाही आणि आपण नॉट रिचेबलही नव्हतो, असं स्पष्टीकरण गायकवाड यांनी दिले आहे. मुंबईमध्ये आमच्या काँग्रेस पक्षाची अनेक ठिकाणी संघटनात्मक ताकद चांगली आहे. हा मुद्दा लक्षात घेऊन जागावाटप होणं गरजेचं होतं, असं वर्षा गायकवाडांनी म्हंटलं होतं. (Latest Marathi News)

Varsha Gaikwad News
Congress Vs NCP Ajit Pawar : लोकसभेत पंजा Vs घड्याळ आमना-सामना नाहीच !

गायकवाड यांनी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधला. ते म्हणाल्या, "मला कुणी फोन केलाच नाही तर मी कशी नॉट रिचेबल झाले मला माहिती नाही. मुंबईमध्ये मागील काळात आम्ही लोकसभेच्या (Lok Sabha) पाच जागा लढत होतो आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक जागा लढत होती. त्यामुळे आम्हाला बरोबरीची भूमिका मिळावी, अशी आमची इच्छा होती. "

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Varsha Gaikwad News
Mahayuti BJP Politics : महायुतीत झाले १६ भिडू, लोकसभेत जमेना, विधानसभेत काय घडेल?
Varsha Gaikwad News
Lok Sabha Election: जिथे ताकद नाही, त्याच जागा काँग्रेसच्या वाट्याला; जागावाटपावर वर्षा गायकवाड नाराज

"मुंबईत आम्ही तीन महत्त्वाच्या जागा आहेत. आम्ही बैठकीत आणि पत्रांद्वारे नेहमीच तीन जागांसाठी आग्रही होतो. या ठिकाणी आपण मजबूत आहोत आणि या जागा आम्हाला मिळायला पाहिजे, अशी आम्ही पक्षासमोर भूमिका मांडली. आता पक्षाने जी भूमिका घेतली ते आम्हाल शिरसावंद्य आहे, "असे गायकवाड (Varsha Gaikwad) म्हणाल्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com