Vijay Wadettiwar Google
विदर्भ

Vijay Wadettiwar : राज्यातील सलोखा बिघडला तर त्याला भुजबळ, जरांगे जबाबदार

Atul Mehere

Nagpur Political News : मराठा आरक्षण आणि ओबीसी या मुद्द्यावर कोणत्याही समाजात मतभेद नाहीत. आजपर्यंत राज्यात तशी परिस्थिती कधी निर्माण झालेली नाही. त्यामुळं या संदर्भात छगन भुजबळ असो किंवा मनोज जरांगे पाटील यांच्यापैकी कुणीही हिमनगासारखी टोकाची भूमिका घेणे योग्य नाही. आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील सलोखा बिघडला, त्यातून कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाल्यास त्याला हे जबाबदार असतील, अशी रोखठोक भूमिका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी घेतली.

नागपूर येथे सोमवारी (ता. २०) वडेट्टीवार म्हणाले की, ओबीसींच्या हक्काबाबत बोलताना दोन समाजात दरी वाढत संघर्ष निर्माण होईल, याला आपला पाठिंबा नाही, हे आपण आधीच जाहीर केलंय. ओबीसींवर अन्याय होऊ नये, तेवढ्यासाठी केवळ आम्ही लढणार आहोत. अशात दोन समाजात दुही निर्माण होईल, अशी भूमिका जर कुणीही घेत असेल तर आम्ही त्यांनाही विरोध करू. (Congress Leader Vijay Wadettiwar's Clear Stand on OBC, Maratha Reservation Chagan Bhujbal, Manoj Jarange will Be Responsible If Law & Order Breaks Down In Maharashtra)

छगन भुजबळ यांच्यावर कोणाचा दबाव आहे? ते कोणामुळं काय बोलत आहेत, हे त्यांनाच विचारावं लागेल. त्याबद्दल आपल्याला कल्पना नाही. आतापर्यंत राज्यात अनेकांना प्रमाणपत्र देऊन झाले आहेत. अशात भुजबळ असू दे, की जरांगे पाटील कुणीही टोकाची भूमिका घेणं अयोग्य आहे. अशा भूमिकांमुळं गावागावांमध्ये भांडणतंटे निर्माण होऊ शकतात. महाराष्ट्र पुरोगामी आहे. त्यामुळं ही बाब राज्याला न शोभणारी आहे, असं वडेट्टीवार म्हणाले.

सत्तेत असणाऱ्या लोकांनी समस्या सोडवायच्या असतात. सत्तेत असणारेच जर समस्या मांडत बसतील तर अशा पदांवर राहण्याला काय अर्थ आहे. महत्त्वाची पदं असतानाही तर कुणी समस्यांबद्दल बोलत असेल तर अशी पदं सोडलेली परवडतात, असा टोला वडेट्टीवार यांनी भुजबळ यांना लगावला. ओबीसी समाजासाठी लढणं हे आपलं कर्तव्य आहे. काँग्रेस पक्षाचा सदस्य म्हणून नव्हे तर ओबीसी समाजातील एक घटक म्हणून आपण ते करीत आहोत, असं त्यांनी स्पष्ट केलं.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शरद पवार यांच्या भेटीबद्दल बोलताना त्यांनी सांगितलं की, पवार हे महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते आहेत. ते काँग्रेसचे नेते नाहीत. आपल्याला आपल्या पक्षाची भूमिका ओबीसी कार्यकर्ता म्हणून मांडत राहावी लागेल आणि ती मांडत राहणार आहे. देशात जातीय विष पेरणारे राजकर्ते आहेत. दिल्लीतून हिंदू-मुस्लिम लढवण्याचं काम सुरू आहे. राज्यातही असे प्रयत्न सुरू आहेत. दोन धर्मात आग लावली जात आहे, अशी टीका वडेट्टीवार यांनी भाजपवर केली.

दानपेटी काढण्यावर ठाम

मंदिरातील दानपेट्या काढून टाका या मतावर आपणही ठाम आहोत. दानपेट्या काढल्या तर मंदिरात फक्त देव राहील पुजारी गायब होतील, असं वडेट्टीवार म्हणाले.

Edited by : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT