Ashok Chavhan Sarkarnama
विदर्भ

Rajya Sabha Election : कोण म्हणाले होते अशोक चव्हाण कसले ‘लिडर’, ते तर ‘डिलर’?

Congress : पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केला फडणवीसांचा व्हिडीओ व्हायरल

संदीप रायपूरे

Rajya Sabha Election : राज्याचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी भाजपात प्रवेश घेतला आहे. भाजपात येताच त्यांना राज्यसभेची लॉटरी लागली आहे. त्यांना भाजपात आणण्यात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मोठा वाटा आहे. आता काँग्रेसचे कार्यकर्ते अशोक चव्हाण यांच्याशी संबंधित एक जुना व्हिडीओ व्हायर करीत आहेत. त्यातून त्यांनी अशोक चव्हाणांसह देवेंद्र फडणवीस यांना चांगलाच टोला लगावला आहे.

नांदेड येथे भाजपचे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या प्रचारार्थ घेतलेल्या एका जाहिर सभेत देवेंद्र फडणवीस यांनी तुफान फटकेबाजी केली होती. त्यांनी अशोक चव्हाणांवर टीकेची झोड उठवली होती. अशोक चव्हाण यांना पक्षाने अनेकदा मंत्री बनविले, एवढेच नव्हे तर त्यांना मुख्यमंत्रिपदाची संधी दिली. पण ते नांदेडचा विकास ते करू शकले नाहीत. ते विकास करणार तरी कसा कारण अशोकराव हे ‘लिडर’ नाही तर ते ‘डिलर’ आहेत. केरोसिनपासून तर पेट्रोलपम्पापर्यंत, मोटर सायकलपासून मोटरगाडी पर्यंतची सगळी डिलरशिप त्यांचीच आहे, अशी टीका फडणवीस यांनी केली होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

नांदेडला ‘लिडर’ची गरज आहे. नांदेडला ‘लिडर’ दिल्याशिवाय आपण गप्प बसणार नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी त्यावेळी ठणकावून सांगितले होते. आता अशोक चव्हाण यांच्यासारख्या ‘डिलर’ला फडणीसांनीच भाजपात आणले अस सांगत काँग्रेस कार्यकर्ते त्यांचा हा जुना व्हिडीओ व्हायरल करीत आहेत. त्यांतून काँग्रेसचे चव्हाण आणि फडणवीस या दोघांनाही चांगलेच चिमटे काढले आहेत. सोशल मीडियावर हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. भाजपने आधी शिवसेना फोडली. त्यानंतर त्यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार पाडले. आता त्यांनी काँग्रेसच्या बड्या माशाला गळाला लावले. आतही फडणवीस ‘आगे आगे देखो होता है क्या’ असे सूचक संकेत देत आहेत.

नांदेडच्या सभेत ज्या पद्धतीने देवेंद्र फडणवीस बोलले होते. त्यावर आता सोशल मीडियावरून काँग्रेस कार्यकर्ते चांगलाच संताप व्यक्त करीत आहेत. नांदेडला ‘लिडर’ देणार असल्याचे फडणवीस बोलले होते. पण त्यांनी अशोक चव्हाणांना ‘डिलर’ संबोधले होते. आता याच ‘डिलर’ला त्यांनी भाजपात कसे घेतले हा प्रश्न उपस्थित होत आहे. काँग्रेस चंद्रपूर मधील गावागावातील व्हॉट्सअॅप ग्रुपवर देवेंद्र फडणवीस यांच्या हा व्हिडीओ काँग्रेस मोठ्या प्रमाणावर व्हायरल करीत आहे. लोकसभा निवडणूक तोंडावर आली आहे. अशात भाजपने कुठल्याही परिस्थितीत चारशे जागा जिंकण्याचा संकल्प केला आहे. आता अनेक पक्ष फोडून ते आपला संकल्प पूर्ण करणार काय‌? असा संतप्त सवाल अनेक जण विचारू लागले आहेत. राज्यसभेच्या जागावरून ओबीसी प्रवर्गाला संधी न दिल्यावरून हा विषय ते चांगलाच रंगवित आहेत.

Edited By : Prasannaa Jakate

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT