Buldhana News : काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी नुकताच पदभार स्वीकारला आहे. त्यांची अद्याप नवीन टीम जाहीर व्हायची आहे. याकरिता झाडाझडती सुरू असताना त्यांना त्यांच्या बुलढाणा जिल्ह्यातूच काँग्रेसला (Congress) मोठा धक्का बसला आहे.
काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विजय अंभोरे यांनी पदाचा आणि काँग्रेसच्या सदस्यपदाचा राजीनामा दिला आहे. दोघेही सुरुवातीपासूनच पक्षांतर्गत विरोधक आहेत. नव्या टीममध्ये आपल्याला स्थान मिळणार नसल्याने अंभोरे पक्षाबाहेर पडले असल्याची चर्चा बुलढाणा जिल्ह्यात आहे.
सपकाळ आणि अंभोरे हे एकमेकांचे पक्षांतर्गत विरोधक आहेत. अंभोरे यापूर्वी बुलढाणा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष होते तसेच अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष होते. त्यांचे आणि हर्षवर्धन सपकाळ (Harshawardhan Sapkal) यांचे कधीच पटले नाही. एकच पक्षात असले तरी दोघांचे गट वेगळे होते. यातच सपकाळ यांची थेट प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. लवकरच ते नवीन कार्यकारिणी जाहीर करतील.
नव्या लोकांना संधी देतील. आपल्याला त्यात स्थान मिळणार नाही याचा अंदाज आल्याने अंभोरे आधीच राजीनामा देऊन मोकळे झाले असल्याची चर्चा काँग्रेस वर्तुळात आहे. विशेष म्हणजे अंभोरे हे काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव मुकूल वासनिक यांचे समर्थक आहेत. वासनिक दोन वेळा बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचे खासदार होते. त्यांनतर ते नागपूर जिल्ह्यातील रामटेकमध्ये आलेत. असे असले तरी बुलढाणा जिल्ह्यात त्यांचा गट आजही कार्यरत आहे.
हर्षवर्धन सपकाळ आणि वासनिक यांचेही संबंध चांगले आहे. सपकाळ हे आमदार होते. मागील अनेक वर्षांपासून ते संघटनेत कार्यरत आहेत. राहूल गांधी यांनी त्यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. जमिनीवरचा व संघटनेतला माणूस म्हणून त्यांची ओळख आहे.
प्रदेशाध्यक्षपदाच्या शर्यतीत अनेक दिग्गज नेते होते. सर्व प्रस्थापितांना डावलून सपकाळांना अध्यक्ष करण्यात आले आहे. त्यामुळे अनेकांना धक्का बसला आहे. अंभोरे यांच्या राजीनाम्यामुळे फारकही उलाथापालथ होणार नाही आणि काँग्रेसमध्ये खळबळ उडाणार नसली तरी प्रदेशाध्यक्षांच्या गृह जिल्ह्यातूनच राजीनाम्याची सुरुवात झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.
राहुल गांधी यांनी हर्षवर्धन सपकाळ यांची महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. जमिनीवरचा व संघटनेतला माणूस म्हणून त्यांची ओळख आहे. प्रदेशाध्यक्षपदाच्या शर्यतीत अनेक दिग्गज नेते होते. सर्व प्रस्थापितांना डावलून सपकाळांना अध्यक्ष करण्यात आले आहे. त्यामुळे अनेकांना धक्का बसला आहे.
अंभोरे यांच्या राजीनाम्यामुळे फारकही उलाथापालथ होणार नाही आणि काँग्रेसमध्ये खळबळ उडाणार नसली तरी प्रदेशाध्यक्षांच्या गृह जिल्ह्यातूनच राजीनाम्याची सुरुवात झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.