Local Body Elections पुन्हा लांबणीवर, सुप्रीम कोर्टाकडून अनेक इच्छुकांचा हिरमोड

Local Body Elections : अनेक महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणखी लांबणीवर पडल्या आहेत.
Local Body Election
Local Body Election Sarkarnama
Published on
Updated on

Local Body Election news : अनेक महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणखी लांबणीवर पडल्या आहेत. आज (25 फेब्रुवारी) सर्वोच्च न्यायालयात होणारी सुनावणी पुन्हा पुढे ढकलण्यात आली आहे. आता ही सुनावणी 4 मार्च रोजी होणार आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांतील ‘ओबीसी’ आरक्षण (OBC Reservation), नगरसेवक संख्या, प्रभाग रचना अशा विविध मुद्द्यांवरून न्यायालयात अनेक याचिका दाखल झालेल्या आहेत. या सर्व याचिका एकत्र करून सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. जवळपास दीड वर्षापासून या याचिका प्रलंबित आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर न्यायालयीन प्रक्रिया लवकर संपून निकाल जाहीर होतील अन् निवडणूक प्रक्रिया सुरू होईल, अशी चर्चा सुरू होती.

Local Body Election
Devendra Fadnavis यांच्या चाळणीत 16 अधिकारी सापडले फिक्सर; 109 जण पास

यासाठी 22 जानेवारी रोजी यावर्षीची पहिलीच सुनावणी होणार होती. अत्यंत महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या या सुनावणीत काय होणार याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष होते. पण 22 जानेवारीची सुनावणी 28 जानेवारीपर्यंत पुढे ढकलली. त्यानंतर 25 फेब्रुवारी तारीख देण्यात आली. त्यानंतर आता 4 मार्च ही तारीख देण्यात आली आहे.

Local Body Election
CM Devendra Fadnavis झाले 'गुरूजी' : IAS अधिकाऱ्यांची होणार 100 मार्कांची 'परीक्षा'

आज सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) 29 व्या क्रमांकावर प्रकरण मेन्शन होते, पण कोर्टरुम क्रमांक 3 मध्ये दुपारी एक वाजेपर्यंतच कामकाज होणार होते. या वेळेपर्यंत आठव्या क्रमांकापर्यंतची प्रकरणे न्यायालयाने ऐकली. कामकाज संपताना याचिकाकर्त्यांचे वकील आणि सरकारी पक्षाच्या वतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी 4 मार्च ही तारीख मागितली. त्यावर न्यायालयाने विचार करून निर्णय देऊ असे स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com