Nagpur News: मतदानाच्या एक दिवस आधी काही नगरपालिका आणि नगरपरिषदेच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्याने राज्य निवडणूक आयोगावर सर्वच जण रोष व्यक्त करत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नाराजीनंतर आता काँग्रेसचे नेते नाना पटोले (Nana Patole) यांनी निवडणूक आयुक्तांवर महाभियोग दाखल करण्याची मागणी केली आहे. यावर भाजपचे नेते आणि राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, निवडणुका पुढे ढकलायला नको होत्या. मात्र, पटोले यांना प्रत्येक गोष्टीत राजकारण करायची सवय आहे असे सांगून बावनकुळे यांनी महाभियोग मागणी फेटाळून लावली.
राज्य निवडणूक आयोगाच्या घोळावर आमचीसुद्धा हरकत आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्वतःच नाराजी व्यक्त केली आहे. भाजपच्यावतीने आयोगाला चार पत्र पाठवण्यात आले आहे. राज्य निवडणूक आयोगाने घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात आम्ही पत्र देऊन आमची भूमिका मांडली आहे. या अनुषंगाने पुढे काय करता येईल ते बघू असे बावनकुळे म्हणाले.
सर्वोच्च न्यायालयाने 50 टक्क्यांच्यावर आरक्षण जाणार नाही असे स्पष्ट आदेश दिले होते. त्यानंतर आयोगाने ही मर्यादा ओलांडली. त्यामुळे सर्वत्र घोळ झाला आहे. आगामी महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये निवडणूक पुढे ढकलली जाणार नाही याची काळजी आयोगाने घेण्याची गरज आहे. सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशानुसारच निवडणूक आयोगाला निर्णय घ्यायचा असल्याचेही चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणाले.
केंद्रीय कृषिमंत्री शिवराज चव्हाण यांनी महाराष्ट्र सरकारने अतिवृष्टीने झालेल्या नुकसान भरपाईचा प्रस्तावच पाठवला नाही असे लोकसभेत सांगितले आहे. यावर बावनकुळे म्हणाले, राज्य प्रस्ताव पाठवतो त्यानंतरच केंद्रीय दक्षता पथक पाहणीसाठी येते. केंद्रीय पथक आणि राज्य सरकार आपसात भरपाईच्या आकडेवारीची ताळमेळ बसवते.राज्यात झालेल्या अतिवृष्टीची मदत सर्वांना दिली जाणार आहे. केंद्राच्या पथक महाराष्ट्रात आले होते. त्यांनी संपूर्ण नुकसान भरपाईची पाहणी केली.
राज्याचे आणि केंद्राचे सर्वेक्षणाच्या रिपोर्ट एकत्रितपणे केंद्राला जाते. जी मदत करायची आहे ते करणारच आहे. एनडीआरएफच्या निकषानुसार केंद्र मदत देत असते असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.