Bhaiyyuji Maharaj Politics: विलासरावांच्या एका फोनवर भैय्यूजी महाराजांनी अख्खं मनमोहन सिंग सरकारच अडचणीतून काढलेलं बाहेर

Vilasrao Deshmukh And Bhaiyyuji Maharaj Connection: प्रसिध्दीचं मोठं वलय लाभलेल्या भैय्यूजी महाराज यांचा मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात मोठा भक्तपरिवार राहिला होता. भैय्यूजी महाराज हे आध्यात्मिक गुरू असून त्यांची राजकारणामध्ये सगळ्याच राजकीय पक्षांमध्ये चांगली ओळख होती. त्यांच्या आश्रमात सिनेसृष्टीसह उद्योगजगतातील बड्या हस्तींचा सातत्यानं राबता होता.
Vilasrao Deshmukh Manmohan Singh Bhaiyyuji Maharaj   (1).jpg
Vilasrao Deshmukh Manmohan Singh Bhaiyyuji Maharaj (1).jpgSarkarnama
Published on
Updated on

Bhaiyyuji Maharaj News : गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे यांनी प्रचारादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्याबाबत एक धक्कादायक दावा केला. गुट्टे यांच्या या दाव्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली अन् 2018 साली आत्महत्या केलेले प्रसिध्द आध्यात्मिक गुरू भैय्यूजी महाराज (Bhaiyyuji Maharaj) पुन्हा एकदा चर्चेत आले.पण याच भैय्यूजी महाराजांनी 2011 मध्ये केंद्रातील काँग्रेसचं मनमोहन सिंग सरकार एका मोठ्या संकटातून बाहेर काढलं होतं.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांना अडचणीत आणण्याची एकही संधी सध्या त्यांच्या विरोधक सोडताना दिसून येत नाही. मंत्रिपद गमावल्यानंतरही मुंडेंच्या अडचणी अजूनही कमी झालेल्या नाहीत. अशातच आता गंगाखेडचे रासपचे आमदार रत्नाकर गुट्टे यांनी माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्याविषयी मोठा गौप्यस्फोट करतानाच त्यांना थेट इशाराही दिला आहे.

गुट्टे म्हणाले, "धनुभाऊ, तुमचा इंदोरमध्ये मर्डर झाला असता. पण भैय्यूजी महाराजांनी तुम्हाला वाचवलं. तुम्ही कोणत्या हॉटेलवर होतात हे देखील आम्हाला माहिती आहे, पण आताच सगळं काढणार नाही." असा हल्लाबोलही गुट्टेंनी मुंडेंवर केला होता. महत्त्वाची बाब म्हणजे धनंजय मुंडेंनी गंगाखेडमध्ये जाऊन रत्नाकर गुट्टे यांचा थेट 'नीरव मोदी' असा उल्लेख केला होता. तर धनंजय मुंडेंच्या टीकेला रत्नाकर गुट्टे यांनीही प्रत्युत्तर देताना "तुम्ही मला नीरव मोदी म्हणालात. पण तुम्ही तर विजय मल्ल्या आहात," असं म्हटलं होतं.

रत्नाकर गुट्टे यांनी धनंजय मुंडेंचं इंदोर आणि भैय्यूजी महाराज कनेक्शन बाहेर काढल्यामुळे नव्या चर्चांना उधाण आलं. यापूर्वी करुणा मुंडे यांनीही धनंजय मुंडेंशी कसा संपर्क झाला, त्यांच्याशी ओळख कशी वाढत गेली, याबद्दल भाष्य करतानाच इंदोरमधील भैय्यूजी महाराजांच्या आश्रमाचं नाव घेतलं होतं. याच आश्रमात दोघांची भेट झाली होती. त्यावेळी धनंजय मुंडे आणि करुणा शर्मा यांचं मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. मग मंदिरात जाऊन दोघांनी लग्न केलं, असा सगळा घटनाक्रम त्यांनी सांगितला होता.

Vilasrao Deshmukh Manmohan Singh Bhaiyyuji Maharaj   (1).jpg
Gowal Padvi News : महाराष्ट्रातील खासदार पाडवींची लोकसभेत खळबळजनक मागणी, काँग्रेस अडचणीत; भाषणानंतर उठले वादळ

प्रसिध्दीचं मोठं वलय लाभलेल्या भैय्यूजी महाराज यांचा मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात मोठा भक्तपरिवार राहिला होता. भैय्यूजी महाराज हे आध्यात्मिक गुरू असून त्यांची राजकारणामध्ये सगळ्याच राजकीय पक्षांमध्ये चांगली ओळख होती. त्यांच्या आश्रमात सिनेसृष्टीसह उद्योगजगतातील बड्या हस्तींचा सातत्यानं राबता होता.

तत्कालीन महाराष्ट्र सरकारनं भैय्यूजी महाराज यांना राष्ट्रसंत ही उपाधीही दिली होती. आध्यात्मिक गुरू म्हणून मोठी प्रसिध्दी मिळवली होती.सर्वच राजकीय नेत्यांशी त्यांचा चांगलाच सलोखा होता. चित्रपटक्षेत्रातील अनेक सितारे उद्योगक्षेत्रामधील त्यांच्या आश्रमात कायमच राबता होता. ही मंडळी महाराजांचे दर्शन आणि मार्गदर्शनासाठी रांगा लावून असायचे.

Vilasrao Deshmukh Manmohan Singh Bhaiyyuji Maharaj   (1).jpg
Parli Municipal Election : सरकारच्या सुरक्षेवर भरवसा नाही, मला स्ट्राँग रूमजवळच झोपायचं, अंथरूण-पांघरूण घेऊन येतो; परळीतील उमेदवार पतीच्या मागणीपुढं प्रशासन आवाक

मध्य प्रदेशमधील इंदोर शहरात राहणारे भैय्यूजी महाराज यांचं राजकीय क्षेत्रातील एन्ट्री ही महाराष्ट्रातून झाली होती. त्यांचं मूळ गाव हे महाराष्ट्रातील बुलडाणा जिल्ह्यात आहे. महाराजांचं याठिकाणी नेहमी येणं-जाणं होतं. तत्कालीन काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्यामुळे 1995 मध्ये महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख (Vilasrao Deshmukh) यांच्यासोबत भैय्यूजी महाराज जोडले गेले. एकतर मराठा असणं ही भैय्यूजी महाराजांच्या महाराष्ट्रातील वाढत्या प्रभावाच जमेची बाजू ठरली.

काँग्रेसचे दिवंगत नेते आणि माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या संपर्कात आल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात भैय्यूजींची ओळख वावर वाढता राहिला. विलासरावांनंतर केवळ काँग्रेसचेच नेते नाही,तर राष्ट्रवादी आणि भाजप नेत्यांसह सर्वच राजकीय पक्षांच्या नेतेमंडळींशी महाराजांचा घनिष्ठ संबंध निर्माण झाले. गोपीनाथ मुंडे आणि नितीन गडकरी यांच्या नावाचाही त्यात समावेश होता.

Vilasrao Deshmukh Manmohan Singh Bhaiyyuji Maharaj   (1).jpg
Kokan Politics : मतदानादिवशी शिवसेना-भाजपसह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भिडले, आता गुन्हा दाखल... गोगालेंच्या मुलाचाही समावेश

भैय्यूजी महाराज यांच्या आश्रमांद्वारे आध्यात्मिक आणि समाजहिताची अनेक मोठी मार्गी लागल्याचंही दिसून आलं. त्यांनी स्वच्छतेच्या क्षेत्रातही त्यांनी उल्लेखनीय काम केलं. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिल्लीत लोकपालच्या मुद्द्यावरुन ऑगस्ट 2011 मध्ये दिल्लीत बेमुदत उपोषण सुरू केले होते. हजारे यांनी त्यावेळी केंद्र सरकारशी चर्चेला नकार दिला होता. त्यावेळी विलासरावांनी भैय्यूजी महाराजांना मध्यस्थीची भूमिका करण्याची विनंती केली अन् त्यांनी ती यशस्वीरीत्या पार पाडल्याचं पाहायला मिळाली होती.

पण कौटुंबिक तणावातून भैय्यूजी महाराज यांनी 12 जून 2018 रोजी स्वत:वर गोळी झाडून घेत आत्महत्या केली. पहिल्या पत्नीच्या मृत्यूनंतर भैय्यूजी महाराजांनी डॉ.आयुषी शर्मा यांच्याशी त्यांनी दुसरा विवाह केला. याच लग्नानंतर त्यांच्या आयुष्यात वादाला सुरुवात झाल्याची चर्चा आहे. आत्महत्येनंतर भैय्यूजी महाराजांच्या आत्महत्येनं राजकीय विश्व, चित्रपटसृष्टी, उद्योगजगतासह त्यांच्या भक्त परिवारालाही मोठा धक्का बसला होता. त्यांच्या सुसाईड नोटमध्ये भैय्यूजी महाराजांच्या संपूर्ण संपत्तीचे अधिकार त्यांच्या पत्नी किंवा मुलीच्या हाती न देता त्यांचे सेवादार विनायक यांच्याकडे देण्याबाबत उल्लेख आढळून आला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com