Congress  Sarkarnama
विदर्भ

Amravati Loksabha : काँग्रेस चे ठरले अमरावती मध्ये आमदाराला 'बळ' देत खासदार करणार !

Congress Candidate : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अकोल्यात पत्रकारांशी बोलताना अमरावती नवनीत राणा यांना भाजप कडून उमेदवारी देण्याचे संकेत दिले आहे. या पार्श्वभुमीवर आज काँग्रेसने अमरावती जिल्ह्यातील आमदाराला बळ देण्याचे निश्चित करत लोकसभेची उमेदवारी आमदाराला देण्याचे संकेत दिले आहे.

Sachin Deshpande

Loksabha Election 2024: अमरावती लोकसभा मतदारसंघात अपक्ष खासदार नवनीत राणा प्रतिनिधीत्व करत आहे. आज अकोल्यात भाजप नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमरावती लोकसभा मतदार संघात भाजप च्या तिकिटावर लढला जाईल असे स्पष्ट केले. हे स्पष्ट करताना फडणवीस यांनी थेट पाच वर्षात नवनीत राणा यांनी भाजप ला दिलेल्या पाठिंब्याचे कौतुक करत अस्पष्टपणे नवनीत राणा यांना उमेदवारी देण्याचे संकेत दिले. केवळ संसदीय बोर्ड त्यावर निर्णय घेईल असे म्हणत त्यांनी फक्त नवनीत राणा यांची उमेदवारी आज घोषित केली नाही. काँग्रेस च्या दिल्ली स्थित विश्वसनीय सुत्रांनी अमरावती जिल्ह्यातील दर्यापूरचे विधानसभेचे आमदार बळवंत वानखडे यांना तिकिट निश्चित झाल्याचे स्पष्ट केले आहे. काँग्रेस च्या यादीत त्यांचे नाव असेल असे ही दिल्लीत विश्वसनीय सुत्रांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता दर्यापूरचे आमदार बळवंत वानखडे यांना काँग्रेस ने बळ, ताकद देत खासदार करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. या निवडणुकीत प्रहार ची काय भूमिका राहते हे पाहण्यासारखे असेल.

2019 च्या निवडणुकांमध्ये ही मुख्य लढत अपक्ष उमेदवार नवनीत राणा आणि तत्कालीन शिवसेनेचे उमेदवार आनंदराव अडसूळ यांच्यामध्ये झाली होती. सध्या आनंदराव अडसूळ हे देखील शिंदे गटात सामील झालेत. त्याचवेळी नवनीत राणा यांनी 5,05,133 मतं जिंकत खासदार झाल्या होत्या. आनंदराव अडसूळ यांना 4,68, 687 मतं पडली होती. नवनीत राणा या काँग्रेस राष्ट्रवादीकडून मैदानात उतरल्या होत्या. गेली पाच वर्षे त्यांनी केंद्रातील भाजप सत्तेला पाठिंबा दिल्याचे आज देवेंद्र फडणवीस यांनी अकोल्यात माध्यमांना सांगितले. त्यामुळे यंदा पुन्हा अमरावती येथे नवनीत राणा यांना तिकिट मिळणार असून केवळ त्या अपक्ष न राहता भाजप च्या तिकिटावर लढणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अमरावती लोकसभा मतदारसंघ हा 1991पर्यंत काँग्रेसचा बालेकिल्ला होता. भारताच्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील निवडून आल्यानंतर हा बालेकिल्ला काँग्रेसच्या हातून निसटला. त्यानंतर 1996 मध्ये शिवसेनेचे उमेदवार अंनत गुडे, 1998 मध्ये काँग्रेस आणि रिपाईचे उमेदवार रा. सु.गवई निवडून आले होते. तर पुन्हा 1999 आणि 2004 मध्ये सेनेचे अंनत गुडे निवडून आले होते. 2009 मध्ये हा मतदारसंघ अनुसुचित जातींकरिता राखीव ठेवण्यात आला. पण तरीही या मतदारसंघावर सेनेने आपलं वर्चस्व कायम ठेवलं आणि दोनदा आनंदराव अडसूळ हे निवडून आले. पण 2019 च्या निवडणुकांमध्ये सेनेच्या ताब्यातून हा मतदार संघ निसटला.

अमरावती लोकसभा मतदारसंघ हा सध्या अनुसुचित जातींसाठी राखीव आहे. दर्यापूर विधानसभेवर काँग्रेसचे बळवंत बसवंत वानखडे यांना उमेदवारी देत काँग्रेस ने हा मतदार संघ स्वतःकडे खेचण्याची तयारी सुरु केली आहे. मध्यंतरी या मतदार संघात वंचित ने देखील मोठा मेळावा घेतला होता. त्यानंतर येथे सुजात आंबेडकर यांना तिकिट देण्याची मागणी झाली होती. खासदार नवनीत राणा ह्या 2019 मध्ये अमरावती लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर निवडून आल्या. काँग्रेसकडून दर्यापूर विधानसभेचे विद्यमान आमदार बळवंत वानखडे यांच्या नावाची शिफारस स्थानिक नेत्यांनी केली आहे. त्यामुळे आज काँग्रेस च्या विश्वसनीय सुत्रांनी बळवंत वानखडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे स्पष्ट केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT