Loksabha Election 2024 : काँग्रेस महाराष्ट्रात 18 जागा लढणार, दिल्लीतील बैठकीत शिक्कामोर्तब?

Maharashtra Congress News : महाविकास आघाडीचे जागा वाटप अद्याप जाहीर नाही, गुरुवारी मुंबईत होणार निर्णायक बैठक
Congress News
Congress NewsSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Congress and Loksabha Election 2024 : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या गोटातून एक मोठी बातमी समोर आली आहे. महाविकास आघाडीचे जागावाटप अजून जाहीर झालेले नाही. जागा वाटपाच्या अंतिम निर्णयाबाबत गुरुवारी मुंबईत महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक होणार आहे. परंतु तत्पुर्वीच काँग्रेसने महाराष्ट्रात 18 जागा लढवण्याच्या निर्णयावर दिल्लीत शिक्कामोर्तब झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या जागांबाबत बुधवारी काँग्रेसची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक झाली. या बैठकीत काँग्रेसने महाराष्ट्रातील लोकसभेच्या 18 मतदारसंघात उमदेवार उभा करण्याचा निर्णय घेतला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दिल्लीत पार पडलेल्या काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत जागा वाटपाबाबत निर्णय झाल्याची माहिती आहे. तर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीस, महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, आमदार सतेज पाटील या प्रमुख नेत्यांची उपस्थिती होती, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com