Congress leader Prashant Padole holds Janata Darbar under a tree after Tirora Panchayat denies permission. Sarkarnama
विदर्भ

Congress News : नाना पटोलेंचा पठ्ठ्या प्रशासनावर भारी... जनता दरबारला परवानगी नाकारली; झाडाखाली ऐकली जनतेची गाऱ्हाणी!

Congress News : प्रशासकीय यंत्रणेनं त्यांना तिरोडा पंचायत समितीमध्ये जनता दरबार घेण्यास परवानगी नाकारली. मग काय प्रशांत पडोळे यांनी झाडाखालीच जनता दरबार भरवून सत्ताधाऱ्यांना अडचणीत आणले, जनतेची सहानुभूती मिळवली.

Rajesh Charpe

Congress News : राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर विरोधी पक्षातील खासदार-आमदारांची कोंडी केली जात असल्याचा आरोप वारंवार होतो. भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे खासदार प्रशांत पडोळे यांच्याबाबत असाच प्रकार घडल्याचे आरोप होत आहेत. प्रशासकीय यंत्रणेनं त्यांना तिरोडा पंचायत समितीमध्ये जनता दरबार घेण्यास परवानगी नाकारली. मग काय त्यांनी झाडाखालीच जनता दरबार भरवून सत्ताधाऱ्यांना अडचणीत आणले, जनतेची सहानुभूती मिळवली.

पण आता विद्यमान खासदारांना पंचायत समितीचे सभागृह देण्यास कोणी परवानगी नाकारली, कुठल्या नेत्याच्या आदेशाचे अधिकाऱ्यांनी पालन यावरून राजकीय चर्चांना उधान आले आहे. अशी परवानगी नाकारणे हा केवळ खासदारांचा नाही तर मतदारसंघाचा आणि लोकशाही व्यवस्थेचा अपमान असल्याची प्रतिक्रिया खासदार पडोळे यांनी दिली. तिरोडा उपविभागीय अधिकाऱ्यांनी नियोजित कार्यक्रम अवघ्या काही अर्धा तास आधी रद्द केला. त्यांची सूचना किंवा संपर्क करू शकले नाहीत हे दुर्दैव आहे, असेही ते म्हणाले

भाजपचे उमेदवार सुनील मेंढे यांना पराभवाची धूळ चारत काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे विश्वासू अशी ओळख असलेले प्रशांत पडोळे मोठ्या फरकांनी निवडून आले. निवडून आल्यानंतर पडोळे फारसे सक्रिय नव्हते. मात्र त्यांनी अलीकडे मतदारसंघात फिरणे सुरू केले आहे. लोकांच्या भेटीगाठी वाढवल्या आहे. तिरोडा येथे त्यांनी जनता दरबार घेण्याचे ठरवले होते. याकरिता पंचायत समितीला सभागृह उपलब्ध करून देण्याचे पत्र त्यांनी उपविभागीय अधिकारी यांना दिले होते. मात्र अधिकाऱ्यांनी 10 मे 2011 एका शासकीय आदेशाचा हवाला देऊन त्यांना सभागृह उपलब्ध करून देता येणार नसल्याचे कळविले होते.

या निर्णयानुसार मंत्र्यांना अधिकृत सभागृह देण्याची तरतूद आहे. खासदार, आमदार या अशासकीय सदस्यांना तसे अधिकार नाही. त्यामुळे त्यांच्या जनता दरबारामध्ये शासकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहण्यास बांधील नाहीत. सबब जनता दबार रद्द करण्यात आला असल्याचे खासदार पडोळे यांना कळवण्यात आले होते. मात्र खासदार पडोळे यांनी जनता दरबार घेणारच असे ठरवले. ठरलेल्या वेळी ते आले आणि पंचयात समितीच्या सभागृहाच्या समोरच्या झाडाखाली त्यांनी आपला जतना दरबार भरवला.

एवढेच नव्हे तर दरबारात आलेल्या तक्रारी आणि समस्या सोडवण्यासाठी त्यांनी मोबाईलवरून अधिकाऱ्यांना निर्देश दिले. जनतेच्या समस्या सोडविण्यात दिरंगाई केल्याबद्दल अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले. हे सारे लोकप्रतिनिधी या नात्याने त्यांचे कर्तव्य आहेच. तरी प्रशासकीय स्तरावर खासदारांना बैठकीकरिता, जनतेचे प्रश्न ऐकून घेण्यासाठी सभागृह नाकारणे हे कितपत योग्य आहे, अशी चर्चा जिल्ह्यात सुरू झाली आहे. काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी सरकार आणि प्रशासनावर सडकून टीका केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT