PM Narendra Modi Sarkarnama
विदर्भ

Congress questions to Modi : पंतप्रधान मोदींना काँग्रेसचे 10 सवाल ; विदर्भ दौऱ्याकडे सगळ्यांचेच लक्ष!

Rajesh Charpe

Maharashtra Congress on PM Modi News : पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी विदर्भात येत आहेत. त्यांच्या स्वागतासाठी भाजपची जय्यत तयारी सुरू आहे. विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर ते काय नव्या घोषणा करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दुसरीकडे काँग्रेसने मोदींना दही प्रश्न विचारले असून त्याची उत्तरे मागितली आहेत.

आता ते आपल्या भाषणात याची काय उत्तरे देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी मोदी(Modi) विदर्भात आले होते. लोकसभेप्रमाणे विधानसभेचाही त्यांचा दौरा निष्फळ ठरेल असा दावा शहर काँग्रेसचे अध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांनी केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी वर्धा येथून टेक्सटाईल पार्कचे उद्‍घाटन करणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक होऊ घातल्याने काही महत्त्वाच्या घोषणा ते करणार असल्याचे बोलले जात आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसने विदर्भातील प्रमुख मुद्यांकडे मोदी यांचे लक्ष वेधण्यासाठी १० प्रश्न उपस्थित करून त्याचे उत्तर देण्याची मागणी केली आहे.

काँग्रेसने उपस्थित केलेले प्रश्न काय आहेत? -

नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरी औद्योगिक क्षेत्रातील सोलार पॅनेल प्रकल्प गुजरातमध्ये पळवण्यात आला. यामुळे तीन हजार युवक रोजगारांपासून वंचित झाले आहेत, नागपूरमध्ये वर्षभरात महिलांवरील अत्याचाराची २४७ प्रकरण समोर आली, असे असताना भाजपची(BJP) लाडकी बहीण योजना महिलांचे संरक्षण कसे करणार?, विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी काय उपाययोजना करणार?, विदर्भाला दुष्काळमुक्त करण्यासाठी ४५ अपूर्ण सिंचन प्रकल्प केव्हा पूर्ण करणार?

तसेच अमरावतीत एका गर्भवती महिलेला रुग्णवाहिकेची वाट पहाताना मृत्यू झाला, अकोल्यातील खारट पाण्याची समस्या केव्हा दूर करणार?, ५५ हजार कोटींच्या समृद्धी मार्गाला वर्षभरातच तडे गेले, दशकभरापासून अपूर्ण असलेला नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्प केव्हा पूर्ण करणार?, या प्रकल्पातील कॅगने उघड केलेला भ्रष्टाचारवार आपण काय करणार? असे प्रश्न काँग्रेसने उपस्थित केले आहेत.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT