Nana Patole Sarkarnama
विदर्भ

Nana Patole : निवडणूक आयोग बूथ कॅप्चरिंग करत आहे का? नाना पटोले यांचा सवाल

Congress State President Nana Patole Election Commission : ईव्हीएमविरोधात काँग्रेस तिसऱ्या दिवशी देखील आक्रमक झाली असून, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहेत.

Rajesh Charpe

Nagpur News : विधानसभेच्या निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवाचा सर्वाधिक फटका काँग्रेसला बसला. सर्वाधिक जागा खेचून घेतल्यानंतरही काँग्रेस फक्त सोळा आमदार निवडून आलेत. या निकालावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शंका व्यक्त केली आहे.

महाराष्ट्रमध्ये 7.6 टक्के मतदान वाढले. मात्र मतदानासाठी रांगा लागलेल्या कुठेही दिसल्या नाहीत. सायंकाळी 62.2 टक्के मतदान झाले होते. मात्र रात्री 66.5 मतदान झाल्याचे सांगण्यात आले. अचानक नऊ लाख मते कशी काय वाढली, याचे आश्चर्य वाटते. निवडणूक आयोग बूथ कॅप्चरिंग करत आहे का? असा सवाल नाना पटोले यांनी उपस्थित होते.

'ईव्हीएम' (EVM) मी बोललो नाही. आमचा निवडून आयोगाचा कार्यप्रणालीवर आक्षेप आहे. जनतेलाचासुद्धा हाच प्रश्न आहे. व्यवस्था आणि पारदर्शकतेवर आम्हाला शंका आहे. महाराष्ट्रात सात टक्के मतदान कसं वाढले याचे उत्तर निवडून आयोगाने देण्याची गरज आहे. ही बाब राष्ट्रीय नेतृत्वामार्फत मुख्य निवडणूक आयोगाने पत्राद्वारे कळविली जाणार आहे. आम्ही न्यायालयीन लढाई लढू, निवडणूक आयोगाला प्रश्न विचारू, जन भावनेची लढाई लढू, असेही पटोले यांनी सांगितले.

वाढलेल्या मतदानाची (Vote) टक्केवारी कोणाच्या फायद्याची, कोणाच्या तोट्याची यावर चर्चा होते. असे असले तरी निवडणूक आयोगाच्या पारदर्शकतेवर प्रश्न चिन्ह उपस्थित होत आहे. हे मतदान रात्री कसे वाढले, कुठे गर्दी वाढली होती, कुठे रांगा लागल्या होत्या याचे फोटही निवडून आयोगाने आम्हाला द्यावे. आम्ही मतदान वाढवले, असे आयोग ट्विट करते. मात्र ते कसे वाढले हे सांगत नाही. मतदान वाढीसाठी काय केले, लोक घराबाहेर मतदानाला कसे पडले हे सुद्धा आयोगा सांगावे, असे नाना पटोले म्हणाले.

विशेष म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीत मतदानाची सरासरी टक्केवारी 52 होती. या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आले होते. विधानसभेत टक्केवारी वाढताच महायुतीच्या आमदारांच्या संख्येत वाढ झाली आहे. काँग्रेसचे फक्त 16, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 20 आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे 10 आमदार निवडून आले आहेत.

मतदानाचा दिवशी आलेल्या मतटक्क्यांमध्ये दुसऱ्या दिवशी तब्बल 7.83 टक्क्यांनी वाढ झाल्याचे नाना पटोले यांनी निदर्शनास आणून दिले. महाविकास आघाडी 'ईव्हीएम'कडून आक्रमक झाली असून, वाढलेल्या मतांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे. महाविकास आघाडी 'ईव्हीएम'विरोधात जनआंदोलनाच्या तयारीत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT