BJP Politics : एक पारवे पराभूत झाले दुसऱ्या पारवेंचे भाजप काय करणार?

Umred Assembly Constituency News : नागपूर ग्रामीणमधील सहापैकी पाच विधानसभा मतदारसंघात भाजप महायुतीचे उमेदवार निवडून आले आहेत. तर फक्त उमरेड विधानसभा मतदारसंघ अपवाद ठरला. या मतदारसंघात भाजपचे उमेदवार सुधीर पारवे यांचा धक्कादायक पराभव झाला आहे.
Sudhir Parve, Devendra Fadnavis, Raju Parve
Sudhir Parve, Devendra Fadnavis, Raju ParveSarkarnama
Published on
Updated on

Nagpur News, 28 Nov : नागपूर ग्रामीणमधील सहापैकी पाच विधानसभा मतदारसंघात भाजप महायुतीचे उमेदवार निवडून आले आहेत. तर फक्त उमरेड विधानसभा मतदारसंघ अपवाद ठरला. या मतदारसंघात भाजपचे उमेदवार सुधीर पारवे (Sudhir Parwe) यांचा धक्कादायक पराभव झाला आहे.

याच मतदारसंघात माजी आमदार राजू पारवे (Raju Parwe) यांना भाजपने बंडखोरी मागे घ्यायला लावली होती. शिवाय यावेळी राजू पारवे यांना त्यांची राजकीय कारकीर्द खंडित होऊनॉ देणार नाही. तुमचं पुनर्वसन करू असा शब्द उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. अशातच आता राज्यात महायुतीची सत्ता आल्यामुले राजू पारवे यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

राजू पारवे काँग्रेसचे आमदार होते. भाजपने (BJP) त्यांना रामटेक लोकसभा निवडणूक लढण्याची ऑफर दिली होती. मात्र, ही जागा शिवसेनेकडे गेल्यामुळे पारवे यांना शिवसेनेत पाठवून उमेदवार करण्यात आले. मात्र लोकसभेला त्यांचा पराभल झाला. यानंतर भाजप त्यांना उमरेड विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देईल अशी त्यांची अपेक्षा होती.

मात्र, माजी आमदार सुधीर पारवे प्रमुख दावेदार असल्याने त्यांना डावलणे भाजपला शक्य झाले नाही. त्यामुळे राजू पारवेंनी बंडखोरी केली. दोन पारवेंच्या भांडणात भाजपचा उमेदवार पराभूत होण्याची शक्यता अधिक होती. त्यामुळे भाजपकडून पारवे यांना बंडखोरी मागे घेण्याची विनंती करण्यात आली. ती त्यांनी मान्यसुद्धा केली.

Sudhir Parve, Devendra Fadnavis, Raju Parve
Raj Thackeray : निकालानंतर EVM बाबत राज ठाकरेंनी उचलले मोठे पाऊल; MNS लागली कामाला

शिवाय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी त्यांना फडणवीस यांनी राजू पारवे यांना राजकीय पुनर्वसनाचे आश्वासन दिले होते. उमरेड विधानसभा मतदारसंघात पारवे विरुद्ध पारवे असा राजकीय सामना रंगत होता. भाजपचे सुधीर पारवे या मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले होते. 2019 च्या निवडणुकीत राजू पारवे यांनी त्यांना पराभूत केले होते.

Sudhir Parve, Devendra Fadnavis, Raju Parve
Priyanka Gandhi : केरळची पारंपरिक कसावू साडी अन् हातात संविधान..! प्रियांका गांधींची लोकसभेतील पहिली 'एन्ट्री' चर्चेत

पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण व्हायच्या आतच त्यांना लोकसभेचे वेध लागले होते. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांच्यासाठी आग्रह धरला होता. मात्र, हा मतदारसंघ शिवसेनेने सोडण्यास नकार दिला. मात्र मुख्यमंत्री शिंदे यांनी बावनकुळे यांच्या आग्रहाखातर तत्कालीन खासदार कृपाल तुमाने यांचे तिकीट कापून राजू पारवे यांच्या हाती दिले होते. शिंदे यांनी तुमाने यांना विधान परिषदेवर घेऊन त्यांचे पुनर्वसन केले होते. आता भाजप पारवे यांचे काय करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com