Amravati Congress taunts Navneet Rana Sarkarnama
विदर्भ

Balwant Wankhede: नवनीत राणांना काँग्रेसनं डिवचलं; खासदार वानखडे यांना कार्यकर्त्यांनी दिली 'ही' भेट

Amravati Congress taunts Navneet Rana:खासदार बळवंत वानखडे यांनी अमरावतीच्या काँग्रेस भवनात गुरुवारी जनता दरबार घेतला. यावेळी युवक काँग्रेसने त्यांचा वाढदिवस साजरा केला.

Mangesh Mahale

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर नवनीत राणा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. अमरावती लोकसभा निवडणूक प्रचारात नवनीत राणा यांनी हनुमान चालीसाचा सातत्याने हट्ट धरला. त्यांच्यावर काँग्रेसकडून टीका करण्यात आली.

निवडणुकीत काँग्रेसच्या बळवंत वानखेडे (Balwant Wankhede) यांनी राणा यांना पराभूत केले. "राणा यांचा पराभव हा हनुमानजीचा प्रसाद आहे," अशी टीका काँग्रेससह (Congress) ठाकरे गटाने यापूर्वी केली आहे.

नवनीत राणा यांना पराभवाची धूळ चारणाऱ्या बळवंत वानखेडे यांचा वाढदिवस अमरावतीत काँग्रेस भवनात नुकताच साजरा करण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांनी राणा यांना डिवचले. वानखेडे यांना वाढदिवसानिमित्त हनुमानजीच्या शक्तीचे प्रतीक असलेली गदा भेट देण्यात आली. वानखेडे यांना गदा भेट देऊन माजी खासदार नवनीत राणा यांना काँग्रेसने डिवचल्याची चर्चा जिल्ह्यात सुरु आहे.

खासदार बळवंत वानखडे यांनी अमरावतीच्या काँग्रेस भवनात गुरुवारी जनता दरबार घेतला. यावेळी युवक काँग्रेसने त्यांचा वाढदिवस साजरा केला. वानखडे यांनी लोकसभा निवडणुकीनंतर पहिला जनता दरबार घेऊन लोकांच्या अडी अडचणी समजून घेतल्या.त्यांच्या जनता दरबाराला मोठा प्रतिसाद मिळाला.

वानखेडे हे दर्यापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसकडून त्यांना उमेदवारी देण्यात आली. या निवडणुकीत आमदार बच्चू कडू यांनी महत्त्वाची भूमिका निभावली. बच्चू कडू यांनी नवनीत राणा यांच्याविरोधात प्रचार केला.

बच्चू कडू यांनी नवनीत राणा यांच्याविरोधात आपल्या प्रहार जनशक्ती पक्षाच्या उमेदावाराला उभं केलं. त्यामुळे त्याचा थेट फटका हा नवनीत राणा यांना बसला. काँग्रेस उमेदवार बळवंत वानखेडे यांना सर्वाधिक मतं मिळाली. त्यामुळे ते विजयी झाले.

अत्‍यंत चुरशीच्‍या लढतीत अमरावती लोकसभा मतदारसंघातून बळवंत वानखडे यांनी नवनीत राणा यांचा १९ हजार ७३१ मतांनी पराभव केला. वानखडे यांना ५ लाख २६ हजार २७१ मते मिळाली, तर नवनीत राणा यांना ५ लाख ६ हजार ५४० मते मिळाली आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT