Kishor Darade: विजयानंतर किशोर दराडे मुख्यमंत्र्यांना म्हणाले, 'साहेब, तुमचा शब्द खरा ठरवला!

Nashik Teachers Constituency Election Result 2024 Kishor Darade: उत्तर महाराष्ट्रातून शिक्षक मतदारसंघात सलग दुसऱ्यांदा किशोर दराडे विजयी झाले आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर महायुतीसाठी हा विजय सर्वात महत्त्वाचा मानला जात आहे.
Kishor Darade News
Kishor Darade NewsSarkarnama
Published on
Updated on

Nashik News: विधानपरिषदेच्या नाशिक विभागीय शिक्षक मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार किशोर दराडे विजयी झाले आहेत. विजयानंतर किशोर दराडेंना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोन आला. भाऊ चौधरी यांच्या फोनवरून दराडे यांच्याशी मुख्यमंत्री बोलले. दराडे यांचे त्यांनी अभिनंदन केले.

"यावेळी साहेब, तुमचा शब्द खरा ठरवला, उभाठा तीन नंबरवर. महाविकास आघाडीचा दारुण पराभव करून मी मोठ्या मताधिक्याने निवडून आलो," असे किशोर दराडे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना सांगितले. किशोर दराडे यांनी शिक्षकांचे आभार मानले आहे.

Kishor Darade News
Ambadas Danve: 'रात्रभर झोप लागली नाही'; लाड यांच्या वक्तव्यावर दानवे म्हणाले,'लाड राजकारणात नवीन आहेत त्यांनी...'

उत्तर महाराष्ट्रातून शिक्षक मतदारसंघात सलग दुसऱ्यांदा किशोर दराडे विजयी झाले आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर महायुतीसाठी हा विजय सर्वात महत्त्वाचा मानला जात आहे. नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी 21 उमेदवार रिंगणात होते.

Kishor Darade News
Bachchu Kadu: दानवे-लाड वाद म्हणजे नळावरील बायकांची भांडणं; बच्चू कडू यांनी दानवेंना फटकारलं

यात शिवसेना शिंदे गटाचे किशोर दराडे, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे महेंद्र भावसार, महाविकास आघाडीचे संदीप गुळवे आणि अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांच्यात प्रमुख लढत रंगली होती. यात किशोर दराडे यांनी विजय मिळवला आहे.

"मी शिक्षकांची कामे केलेली होती, त्यामुळे माझ्यासमोर कोणाचंही आव्हान मला वाटत नव्हतं, त्यामुळे माझा विजय झालेला आहे आणि विजयाचं श्रेय शिक्षकांना देतो," असे दराडे यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com