Dhananjay Munde Vs Vijay Wadettiwar Sarkarnama
विदर्भ

Dhananjay Munde Vs Vijay Wadettiwar : धनंजय मुंडे यांना आणखी एक झटका; वडेट्टीवारांनी साधला निशाणा

Congress Vijay Wadettiwar Dhananjay Munde one rupee crop insurance scheme scam Beed pattern : तत्कालीन कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी त्यावेळी घेतलेल्या निर्णयांच्या चौकशीची मागणी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

Rajesh Charpe

Nagpur News : महायुतीचे सरकार स्थापन झाल्यापासून राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्यासमोरील अडचणी सातत्याने वाढत चालल्या आहेत. सरपंच तंसोष देशमुख यांचा खून, त्यानंतर ते कृषी मंत्री असताना 'DBT' योजना डावलून खरेदी केल्याचे उच्च न्यायालयाने राज्य शासनाला स्पष्टीकरण मागितले आहे.

आता 'बीड पॅटर्न' म्हणून ओळखली जाणारी एक रुपयात पिक विमा योजना रद्द करण्याचा निर्णय युती सरकारने घेतला आहे. त्यामुळे मुंडे यांच्या कार्यकाळात जे काही निर्णय झाले, खरेदीचे व्यवहार झाले ते तापसा याकरिता चौकशी समिती स्थापन करण्याची मागणी विरोधकांमार्फत केली जात आहे.

माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मंत्री मुंडे यांच्यावर थेट हल्ला चढवला. एखाद्या मंत्र्यांच्या आशीर्वादाशिवाय कोट्यवधीचा घोटाळा शक्य नाही, असा आरोप त्यांनी केला. महायुती (Mahayuti) सरकारच्या पहिल्या हिवाळी अधिवेशनात एक रुपयात पिक विमा योजनेवर चांगलाच गदारोळ झाला होता.

भाजपचे आमदार सुरेश धस यांनी या घोट्याळ्याची व्याप्तीच सभागृहसामोर उघड केली होती. एवढेच नव्हे तर सुमारे हजार पानांचे घोटाळ्यांच्या कागदाचे बंड उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याकडे सादर केले. विरोधकांनी नंतर पिक विमा आणि तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर हल्ला चढवला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पिक विमा योजनेच्या घोटाळ्याची पडताळणी आणि तपासणीचे आश्वासन दिले होते. आज ही योजना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

यावर विजय वडेट्टीवार म्हणाले, "एक रुपये पिक विमा हा 'बीड पॅटर्न' म्हणून सरकारने आपली पाठ थोपटली होती. पण खरीप 2024 हंगामात यात भ्रष्टाचार झाल्याचे समोर आले आहे. या योजनेंतर्गत 4 लाख अर्ज आले. त्यातील एक लाख 9 हजार बोगस अर्ज हे बीडमधून होते. आता ज्यांनी हे केले पैसे खाल्ले त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे".

कृषिमंत्री असताना मुंडे यांनी घेतलेल्या निर्णयावर गेल्या काही दिवसात प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. या निर्णयांची समिती नेमून छाननी झाली पाहिजे. अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली. वडेट्टीवार यांनी मुंडे यांच्या कार्यकाळात बारामती येथील सुमारे 150 शेतकऱ्यांना सबसिडीच्या नावावर गंडा घातला होता, असे सांगून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवरही भ्रष्टाचाराचा आरोप वडेट्टीवार यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT