amit shah devendra fadnavis narendra modi sarkarnama
विदर्भ

Congress Vs BJP : ...मोदी, शाह अन् फडणवीस आताही तुम्ही मूग गिळून गप्प बसणार का? काँग्रेस नेत्यानं झापलं

Nana Patole Political News : भाजपचा खासदार डॉ.अनिल बोंडे याला लोकसभेच्या विरोधी पक्षनेत्याबद्दल कोणती भाषा वापरायची याची अक्कल नसावी. बुलढाण्याचा शिंदेंचा आमदार संजय गायकवाड, अक्कल नसलेला, गुंड प्रवृत्तीचा माणूस, त्याला आमदार म्हणावं का असाही प्रश्न पडतो.

Deepak Kulkarni

Nana Patole News : आरक्षण संपविण्याविषयी वक्तव्य केल्यामुळे काँग्रेस नेते राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्याला 11 लाखांचं बक्षीस देण्यात येईल असं विधान शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी केलं होतं.या वादग्रस्त विधानाने उठलेली संतापाची लाट उसळली असतानाच आता भाजप खासदार अनिल बोंडे यांचीदेखील राहुल गांधींवर टीका करताना जीभ घसरली आहे.

त्यांनी राहुल गांधींची (Rahul Gandhi) जीभ छाटू नये, त्यांच्या जिभेला चटके द्यायला हवे अशी जळजळीत टीका केली आहे. त्यावरुनच आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपला झापलं आहे. ये जनता है सब जानती है असंही त्यांनी ट्विट केलं आहे.

काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी सोशल मीडियावरील X फ्लॅटफॉर्मवरुन भाजपला खडेबोल सुनावले आहे.पटोले म्हणाले, भाजपचा खासदार डॉ.अनिल बोंडे (Anil Bonde) याला लोकसभेच्या विरोधी पक्षनेत्याबद्दल कोणती भाषा वापरायची याची अक्कल नसावी. बुलढाण्याचा शिंदेंचा आमदार संजय गायकवाड, अक्कल नसलेला, गुंड प्रवृत्तीचा माणूस, त्याला आमदार म्हणावं का असाही प्रश्न पडतो.

पण राज्यसभेचे खासदार असलेल्या अनिल बोंडेंसारख्या सुशिक्षित माणसानं पण राहुल गांधींविषयी बोलताना तमा बाळगू नये. म्हणजे भाजपच्या नेत्यांमध्ये मस्तवालपणा ठासून भरला आहे हे स्पष्ट होते अशी टीकेची झोड नाना पटोले यांनी उठवली आहे.

नरेंद्र मोदी,अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस बघा तुमच्या पक्षातल्या नेत्याची भाषा,कारवाई करणार की आताही मूग गिळून गप्पच बसणार असा सवालही पटोलेंनी यावेळी केली आहे.याआधीही तरविंदरसिंह मारवाहनं पक्षाचा झेंडा हाती घेऊन राहुल गांधींना थेट जीवे मारण्याची धमकी दिल्याचंही त्यांनी सांगितलं.

तर दुसऱ्यांदा चक्क केंद्रीय मंत्री रवनीत सिंग बिट्टू यांनी राहुल गांधींचा उल्लेख दहशतवादी म्हणून केला होता.तेव्हाही आपलं तोंड शिवलं होतं.आपण काहीही न बोलणं हे आपलेही संस्कार दाखवतात.आज तरी बोलणार का?नाही बोललात तर एवढं लक्षात ठेवा.लोकसभेला कुबड्यांवर सत्ता मिळवलीत,महाराष्ट्र विधानसभेला कुबड्याही मिळणार नाही अशी परिस्थिती मतदारराजा आपली करून ठेवेल असाही हल्लाबोल प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी केलं आहे. #ये_जनता_है_सब_जानती_है असंही त्यांनी ट्विट केलं आहे.

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्याविरोधात प्रक्षोभक विधान करणारे राज्यसभेतील भाजपचे खासदार अनिल बोंडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला. अमरावती पोलिस आयुक्तालयात काँग्रेस नेत्यांनी गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी ठिय्या आंदोलन केलं. खासदार बोंडे यांच्याविरोधात दाखल गुन्ह्यात पोलिस काय कारवाई करणार, याकडं आता लक्ष लागलं आहे.

'वाचाळवीरांनी महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल..'

संजय गायकवाड यांच्यापाठोपाठ अनिल बोंडे यांनी राहुल गांधी यांच्याविषयी केलेलं वक्तव्य म्हणजे आजची नथुराम गोडसे प्रवृत्ती आहे.बोंडे यांचं वक्तव्य भाजपा नेत्यांच्या सूचनेनुसार केले गेलेले वक्तव्य आहे.भाजपा आणि महायुतीच्या वाचाळवीरांनी महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल केला आहे,अशा शब्दांत माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी संताप व्यक्त केला आहे. एका व्हिडीओ संदेशाद्वारे आमदार थोरात म्हणाले की,पुरोगामी महाराष्ट्राची सुसंस्कृत राजकीय परंपरा संपवण्याचा उद्योग २०१४ ला सुरू झाला,तो रोज खालच्या पातळीवर जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT